मागेल त्याला शेततळे योजना 2024 | Magel Tyala Shettale Yojana, Online Application, पात्रता, नोंदणी, कागदपत्र

Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2024 Online Application | मागेल त्याला शेततळे अनुदान योजना 2024 रजिस्ट्रेशन | Magel Tyala Shettale Online Apply | मागेल त्याला शेततळे योजना 2024 संपूर्ण माहिती मराठी | Maharashtra Sarkari Yojana 2024 | मागेल त्याला शेततळे योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, नोंदणी, पात्रता, लाभ

महाराष्ट्र सरकार नेहमीच राज्यातील नागरिकांसाठी लोक उपयोगी, कल्याणकारी विविध प्रकारच्या योजना राबवीत असते, त्या धोरणाला अनुसरून शेतकऱ्यांच्या मागणी नुसार महाराष्ट्र शासन मागेल त्याला शेततळे योजना सुरु केली आहे, या योजनेमुळे शेतीला पाण्याचा स्थायी स्त्रोत उपलब्ध करून देण्यात येतो, महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षात पावसाचे प्रमाण अनिश्चित झालेले आहे, राज्यातील कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, यामुळे शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती करतांना नेहमी पाणी टंचाईला समोर जावे लागते, या सर्व कारणांमुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते, शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करून सात्यत्तता आणण्यासाठी आणि सततच्या पाणी टंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी शेततळे हे अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे असल्याने राज्यातील पावसावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व स्थायी सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला शेततळे योजना सुरु केली आहे, वाचक मित्रहो, या लेखामध्ये आपण मागेल त्याला शेततळे योजना 2024, योजने विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे ऑनलाइन अर्ज करणे, शेततळ्यासाठी असणाऱ्या अटी व नियम, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अनुदान, इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

{tocify} $title={Table of Contents}

मागेल त्याला शेततळे योजना 2024 संपूर्ण माहिती मराठी 

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीसाठी नियमित आणि अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे, त्यानुसार दिनांक 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागेल त्याला शेततळे योजना मंजूर करण्यात आली आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली. हि योजना शासनाची अत्यंत मात्वाकांक्षी योजना आहे, या योजनेंतर्गत राज्यातील पाणी टंचाई ग्रस्त, संकटग्रस्त जिल्ह्यांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल, या मध्ये जास्तीत जास्त 30 x 30 x 3 मीटर या आकारमानाचे व कमीतकमी इनलेट आणि आउटलेटसह प्रकारामध्ये किमान 15 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल आणि तसेच इनलेट आउटलेट विरहित प्रकारामध्ये किमान 20 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल, मागेल त्याला शेततळे योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा शासनाचा निर्णय आहे.

magel tyala shettale yojana maharashtra 2022
Magel Tyala Shettale Yojana Maharashtra  

या योजनेंतर्गत 30 x 30 x 3 मीटर शेततळ्यासाठी 50,000/- रुपये इतके कमाल अनुदान निश्चित करण्यात आले आहे, इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय राहील या योजनेमध्ये जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांना गट करून सामुदाईकरित्या शेततळ्याची मागणी करता येईल या शेततळ्याचे आकारमान शासनाच्या नियमाप्रमाणे लागू असलेल्या आकारमानानुसार राहील. तसेच त्यांना मिळणारे अनुदान व पाण्याचा वापार, पाण्याची हिस्सेवारी याबाबत सबंधित शेतकऱ्यांनी 100 रुपयांच्या स्टँम्प पेपरवर करार करावा आणि तो अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. 

मागेल त्याला शेततळे योजना 2024 उद्दिष्टे [Objectives]

पर्जन्यमान नेहमीच अनिश्चित असते आणि मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात पावसाळा अनिश्चित झाला आहे, त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, त्याचबरोबर जमिनीतल्या पाण्याची पातळी खोल गेलेली आहे, तसेच बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे पिकांना पाणी देण्यासाठी विहिरी नसतात, असे शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात, पावसाच्या पाण्यात पडलेला खंड आणि पाण्याची टंचाई तसेच पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. शेततळयांमुळे शेतकऱ्यांना पावसाच्या खंडित कालावधीत फायदा होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल, त्यामुळे मागेल त्याला शेततळे योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना ठरणार आहे.

 • मागेल त्याला शेततळे योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा शासनाने घेतला आहे
 • टंचाई ग्रस्त भागातील ज्या गावात मागील पाच वर्षात एक वर्ष तरी 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर केली आहे, अशा गावामध्ये प्राधान्याने पहिल्या टप्प्यात 51,500 शेततळी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 • या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 51,000 शेततळी घेण्यात येणार आहे, त्यापेक्षा जास्त मागणी प्राप्त झाल्यास त्याप्रमाणात लक्षांकामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
 • दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती (बीपीएल) व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये जेष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येणार आहे.
 • तसेच शेततळ्याची मागणी करणाऱ्या अर्जदारास प्रथम प्राधान्य याप्रमाणे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली आहे, त्यामध्ये सर्वात मोठ्या आकारमानाचे शेततळे 30 x 30 x 3 मीटर असून सर्वात कमी आकारमानाचे 15 x 15 x 3 मीटर आहे.
 • 30 x 30 x 3 मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी 50,000/- रुपये इतके कमल अनुदान निश्चित करण्यात आहे आहे, इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय राहील, 50,000/- रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी स्वतः खर्च करावयाची आहे.
magel tyala shttale yojana 2022 marathi maharashtra
Magel Tyala Shttale Yojana 2024 Marathi Maharashtra 
 • शेततळ्याची मागणी करण्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचे आहे. जिल्हा पातळीवर मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा व समन्वय समिती, या योजनेवर देखरेख करेल. योजना अंमलबजावणी, सनियंत्रण व समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती असेल. तालुका पातळीवर समिती शेततळयाला मान्यता देयील.
 • शेततळी बांधण्यासाठी मशीनचा वापर करता येईल, मागेल त्याला शेततळे योजना कृषी आयुक्तालयाच्या मार्फत राबविण्यात येणार आहे.
 • शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
 • मागेल त्याला शेततळे, या योजनेसाठी लागणारा निधी Drought Mitigation Measures योजनेत्तर या अंतर्गत सन 2015-16 मध्ये रुपये 50 कोटी पुरवणी मागणीव्दारे व सन 2016-17 मध्ये रुपये 207.50 कोटी इतका निधी मदत व पुनर्वसन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना विभाग नोडल विभाग म्हणून हि योजना कार्यान्वीत करीत आहे.
 • शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना शासनाकडून घेण्यात येत आहे.

Magel Tyala Shettale 2024 Key Highlights

योजनेचे नाव मागेल त्याला शेततळे योजना
व्दारा सुरु महाराष्ट्र शासन
सुरु होण्याची तारीख 9 फेब्रुवारी 2016
लाभार्थी राज्याचे शेतकरी
योजनेचा उद्देश्य शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देणे
आधिकारिक वेबसाईट इथे क्लिक करा
विभाग रोजगार हमी योजना - नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन 


मागेल त्याला शेततळे योजना (लाभ)

 • ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा महात्वपूर्ण फायदा होणार आहे, त्यांचा पावसाच्या पाण्यावरचे अवलंबन कमी होऊन, सिंचनासाठी शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्थाई स्त्रोत उपलब्ध होईल.
 • या योजनेमुळे शेतकऱ्यांना दुरून किंवा दुसरीकडून सिंचनासाठी पाण्याचा प्रबंध करण्याची गरज पडणार नाही
 • ज्या शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती त्यांना या योजनेचा लाभ होऊन त्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
 • मागेल त्याला शेततळे योजनेचे मध्ये मिळणारी धनराशी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल
 • या योजनेमुळे संकटग्रस्त व दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत झाली आहे, तसेच विदर्भ आणि मराठवाडा भागातील शेतकरी मोठ्याप्रमाणात दुष्काळामुळे त्रस्त आहेत, शेततळे हि योजना त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल.

मागेल त्याला शेततळे योजना शासन नियम व अटी

महाराष्ट्र शासनाव्दारे मागेल त्याला शेततळे योजनेसाठी नियम आणि अटी करण्यात आलेल्या आहेत त्या लाभार्थ्यांना बंधनकारक राहतील, अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत  

 • या योजनेंतर्गत कृषी विभागाचे सहाय्यक किंवा कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे बांधणे बंधनकारक राहील
 • शेततळे तयार करण्याचा आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील
 • लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःच राष्ट्रीय बँक किंवा इतर बँकमधील खाते क्रमांक सबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुकच्या झेरॉक्ससह सादर करावा
 • शेततळ्याच्या कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही
 • शेततळ्याच्या बांधावर आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी
 • शेततळ्याच्या दुरस्तीची आणि निगा राखण्याची जवाबदारी संबधित शेतकऱ्यांची राहील, पावसाळ्यात शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था शेतकऱ्यांनी स्वतः करावी
 • लाभार्थी शेतकऱ्याच्या 7/12 उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे
 • शासनाच्या नियमाप्रमाणे मंजूर शेततळे तयार करणे बंधनकारक राहील, तसेच शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावणे बंधनकारक आहे
 • इनलेट आउटलेटची सोय असावी आणि शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणाचा खर्च स्वतः लाभार्थ्याने करावा 

मागेल त्याला शेततळे अनुदान योजना लाभार्थी पात्रता

शासनाच्या नियमाप्रमाणे मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे असेल

 • शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीतकमी 0.60 हेक्टर जमीन असावी, यात कमाल मर्यादा नाही
 • लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्या करिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील, जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे किंवा पुनर्भरण करणे शक्य होईल
 • अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळे किंवा सामुदाईक रित्या शेततळे अशा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा
 • मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे
 • हि योजना फक्त महाराष्ट्रातील मूळ रहिवासी शेतकऱ्यांसाठी आहे 

मागेल त्याला शेततळे योजना लाभार्थ्यांची निवड पात्रता

 • दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) शेतकरी आणि ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये जेष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात यावी
 • या व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची जेष्ठता यादीनुसार, प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्रधान्य याप्रमाणे सदर योजनेंतर्गत निवड करण्यात यावी 

महाराष्ट्र मागेल त्याला शेततळे योजना योजनेची कार्यपद्धती

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम 2000 च्या कलम 25 (1) नुसार महाराष्ट्र लासंधार्ण मंडळाला आपली कामे पार पडण्यासाठी आवश्यक असलेल्या भांडवलामधील राज्य शासनाचा हिस्सा म्हणून महामंडळाच्या निधीमध्ये रुपये 2000/- कोटी एवढ्या एकूण रकमेची तरतूद महामंडळाच्या स्थापनेच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीमध्ये योग्य हप्त्यांमध्ये विभागून देण्यात येईल अशी तरतूद होती.

 • दिनांक 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या निधीमध्ये रुपये 10,000/- कोटी एवढ्या एकूण रकमेची तरतूद महामंडळाच्या स्थापनेच्या तारखेपासून पंचवीस वर्षाच्या कालावधीत योग्य हप्त्यांमध्ये विभागून देण्यात येईल अशी सुधारणा    करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
 • जलसंधारण विभागामार्फत राज्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान, नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम तसेच राज्यातील दुष्काळी भागांमध्ये शाश्वत संरक्षित सिचन व्यवस्था करण्यासाठी विभागवार पाच वर्षाचे आराखडे तयार करून व त्यानुसार जिल्हावार नियोजन करून पाझर तलाव, बंधारे, साठवण तलाव यांचे टप्प्या टप्प्याने बांधकाम करण्याचे नियोजन असून अशा कामांना महामंडळाच्या मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 • त्याच प्रमाणे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील गावे, टंचाईग्रस्त गावे यांना देखील प्रधान्य देण्यात येणार असून शिवाराकडून शेतीकडे तसेच इस्राईल पद्धतीचा अवलंब करण्याबाबत देखील नियोजन करण्यात येणार आहे.
 • शेततळ्याच्या जागा निवडीचे तांत्रिक निकष :- शेततळे हि योजना कृषी विभागा मार्फत पाणलोटाचा उपचार म्हणून आधीपासून राबविण्यात येत आहे त्या प्रमाणे जागेच्या निवडीबाबत निकष सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे असतील
 • ज्या जमिनीतील पाणी पाझराचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी, काळी जमीन ज्यामध्ये चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळ्या साठी योग्य असल्याने अशा जमिनीची निवड करण्यात यावी
 • मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक अशी जमीन असलेली जागा शेततळ्या साठी निवडू नये
 • क्षेत्र उचाराची कामे झालेल्या पाणलोट क्षेत्रात शेततळी प्राधान्याने घेण्यात यावीत
 • टंचाई ग्रस्त गावतील लाभक्षेत्रात शेततळी घेण्यात यावी, त्यासाठी जलसंपदा विभागाच्या शासन निर्णय आणि अटी लागू राहतील
 • ज्या ठकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण तीन टक्क्यांच्या आत आहे, त्या ठिकाणी शेततळी घेण्यात यावीत, नाल्यात किंवा ओहाळाच्या प्रवाहात शेततळे घाण्यात येऊ नये
 • इनलेट / आउटलेट सहित शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळ्याच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील
 • सभोवतालच्या जमिनीत दलदल व चिबड होईल तसेच शेततळे व त्यातून पाणी पाझरून लगतच्या शेतकऱ्यांच्या स्थावर मालमत्तेचे नुकसान होईल अशी जमीन शेततळ्यासाठी निवडण्यास येऊ नये
 • शेततळ्याला लागणारी जागा शेतकऱ्यांनी स्वखुषीने व विनामूल्य द्यावयाची आहे.
 • कामाचा आदेश मिळाल्या नंतर लाभार्थ्यांनी 30 दिवसात काम सुरु करावे आणि तसे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी कळवावे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये 30 दिवसापेक्षा जास्त मुदतवाढ द्यायची झाल्यास तालुकास्तरीय समितीने शेत परिस्थितीची खातरजमा करून आवश्यक असल्यास आणखी 30 दिवस मुदत वाढ द्यावी
 • शेततळी बांधण्याचा कार्यक्रम लाभार्थ्याने स्वतः किंवा माजुराव्दारे, अन्य पर्यायी साधनांच्या सहाय्याने पूर्ण करवयाचा आहे. परंतु याकरिता मशीन उपलब्ध करून घाण्याची जबाबदारी सबंधित लाभार्थ्याची स्वतःची राहील
 • मागेल त्याला शेततळे योजना अंतर्गत शेततळे खोदकामासाठी सबंधित तालुका कृषी अधिकारि यांचे कडील काम सुरु करण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर सबंधित कृषी सहाय्यक/ कृषी सेवक/ कृषी पर्यवेक्षक/ कृषी अधिकारी यांचेकडून शेतामध्ये मंजूर गट नंबर, सर्वे नंबर मध्ये तांत्रिकदृष्ट्या जागा निवड करण्यात आलेल्या ठिकाणी मंजूर आकारमानाचे शेततळे आखणी करून घेण्यात यावे, अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे लाभार्थ्याने शेततळ्याचे खोदकाम करून घावे, आणि खोदकामातून निघालेल्या मातीचा भरणा शेततळ्याच्या पृष्ठभागाच्या शेजारी कृषी अधिकाऱ्यांनी आखून दिलेल्या जागेवर बंध स्वरुपात टाकावा.
 • शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यवर लाभार्थ्यांनी सबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक राहील. तसेच त्याबरोबर लाभार्थीने राष्ट्रीय बँक किंवा इतर बँक खात्याचे पासबुकाचे पहिल्या पानाचे झेरॉक्स जोडावी.
 • लाभार्थी शेतकऱ्याने शेततळ्याचे काम पूर्ण झाल्याचे लेखी कळविल्या नंतर सबंधित कृषी अधिकारी कामाची प्रत्यक्ष मोजमाप करून घेऊन मापदंडाच्या नुसार देय असलेली अनुदानाची रक्कम निधी उपलब्धतेच्या आधारावर योजनेच्या अंतर्गत निधी प्राप्त झाल्यावर 30 दिवसाच्या आत सबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावर रक्कम थेट जमा केली जाईल 
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

 

 मागेल त्याला शेततळे योजना आवश्यक कागदपत्रे

 • या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करावी लागतील
 • जमिनीचा 7/12 उतारा
 • जातीचे प्रमाणपत्र
 • आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
 • दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला
 • आधारकार्ड
 • ८ – अ प्रमाणपत्र
 • स्वतःच्या स्वाक्षरी सहित भरलेला अर्ज 

मागेल त्याला शेततळे योजना ऑनलाइन अर्ज आणि नोंदणी

मागेल त्याला शेततळे योजना, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज आणि नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

magel tyala shettale yojana maharashtra
Magel Tyala Shttale Yojana 2023 Marathi Maharashtra 

 • शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या या https://aaplesarkar.maharashtra.gov.in वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल, शासनाची या वेबसाईटवर योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. अधिकृत वेबसाईटवर भेट दिल्यावर प्रथम होम पेज उघडेल या होम पेजवर ‘’मागेल त्याला शेततळे’’ या पर्यायावर क्लिक करावे.
 • इच्छुक अर्जदार थेट शासनाच्या या लिंकवर जाऊन नोंदणी करू शकता https://egs.mahaonline.gov.in/Registration/Registration यानंतर यशस्वीपणे नोंदणी झाल्यानंतर अर्जदार शेतकरी मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात, यासाठी शासनच्या अधिकृत आपलेसरकार वेबसाईटवर जाऊन, आपले युजरआयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे. आणि इच्छुक अर्जदार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्जाची पावती डाऊनलोड करून स्वतः कडे ठेवावी.
magel tyala shttale yojana 2022 maharashtra
 • मागेल त्याला शेततळे योजने मध्ये नोंदणी करण्यासाठी पात्र शेतकरी जवळच्या पंचायत कार्यालयात किंवा तालुका कार्यालयात जाऊन योजनेसाठी नोंदणी करू शकतात.

मागेल त्याला शेततळे योजना अर्ज स्थिती

magel tyala shttale yojana 2022 maharashtra

या योजनेंतर्गत अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या या अधिकृत वेबसाईट egs.mahaonline.gov.in वर भेट द्यावी लागेल, यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज क्रमांक भरून त्यांच्या अर्जाची स्थिती या वेबसाईटवर ऑनलाइन पाहू शकतात.

मागेल त्याला शेततळे योजना PDF आणि शासन निर्णय

मागेल त्याला शेततळे योजना महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण योजनेबद्दल दिशानिर्देश आणि मार्गदर्शन आणि योजनेचा अर्ज प्रपत्र-2 डाऊनलोड PDF खालीलप्रमाणे आहे.

योजना PDF आणि शासन निर्णय इथे क्लिक करा
योजनेचा अर्ज प्रपत्र-2 PDF डाऊनलोड
अधिकृत वेबसाईट https://egs.mahaonline.gov.in/
महाराष्ट्र सरकारी योजना इथे क्लिक करा

मागेल त्याला शेततळे योजना 2024 शेती उत्पादनामध्ये शाव्श्तता आणण्यासाठी आणि तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे अत्यंत महत्वाचे आणि उपयोगी असल्याने त्याचबरोबर राज्यातील पावसाळ्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी स्थायी पाण्याची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हि योजना राबविली आहे, सर्व पात्र शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा.

या योजने बद्दल आपल्याला आणखी जाणून घ्यायचे असेल तर आपण खाली दिलेल्या सबंधित विभागाच्या टोल फ्री योजना हेल्पलाईन नंबर वर फोन करू शकता.

टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1800 120 8040

महाराष्ट्र मागेल त्याला शेततळे योजना 2023 FAQ

Q. मागेल त्याला शेततळे योजना काय आहे ?

मागेल त्याला शेततळे योजना राज्यातील पावसाळ्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून शेतीच्या उत्पादनात वाढ करणे आणि शेती सिंचनाची समस्या दूर करणे हा शासनाचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत सात प्रकारची शेततळी निश्चित करण्यात आली आहेत.

Q. मागेल त्याला शेततळे योजना कुठे कुठे लागू आहे ?

महाराष्ट्र सरकारने हि योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरु केली असल्यामुळे हि योजना महाराष्ट्र राज्या पुरती मर्यादित आहे.

Q. मागेल त्याला शेततळे योजने मध्ये शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते ?

महाराष्ट्र मागेल त्याला शेततळे अनुदान योजना 2024 अंतर्गत हे शेततळे बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान म्हणून 50,000/- रुपये इतकी रक्कम मिळते, आणि हि रक्कम सरकार कडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

Q. मागेल त्याला शेततळे योजने मध्ये अर्ज कसा करावा ?

मागेल त्याला शेततळे ऑनलाइन रजिस्ट्रेशन 2024 या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेमध्ये अर्ज करावा लागेल आणि या कामा मध्ये काही अडचण आल्यास कृषी अधिकाऱ्याची मदत घेऊ शकता तसेच या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी आपण पंचायत किंवा तालुका कार्यालयात जाऊ शकता.    


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने