Sukanya Samriddhi Yojana In Marathi | पीएम कन्या योजना | सरकारी योजना | Sukanya Samriddhi Yojana Online Form | सुकन्या समृद्धी योजना नोंदणी | सुकन्या समृद्धी योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | सुकन्या समृद्धी योजना कॅल्कुलेटर | केंद्र सरकारी योजना
प्रत्येक आई वडिलांना त्यांच्या मुलांची अत्यंत काळजी असते मुलांच्या संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी पालकांवरच असते, मुलांना चांगले उत्तम शिक्षण मिळावे, त्यांनी भविष्यात मोठी प्रगती करावी यासाठी सर्व पालक त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करीत असतात, पालकांना जशी मुलांच्या शिक्षणाची काळजी असते तशीच काळजी मुलांच्या लग्नाची सुद्धा असते कारण लग्नांमध्ये मोठ्याप्रमाणात खर्च होतो, गरीब पालकांना त्यांच्या मुलांचे पालनपोषण त्यांच्या कमकुवत आर्थिक परस्थितीमुळे योग्यरीतीने करता येत नाही तसेच त्यांना त्यांच्या मुला मुलींचे पालनपोषण करतांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे देशातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना तिच्या चांगल्या शिक्षणसाठी तसेच तिला तिच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनविण्यासाठी आणि नंतर मुलगी सज्ञान झाल्यावर तिला तिच्या लग्नासाठी हक्काचे पैसे मिळावे, या संपूर्ण उद्देशाने केंद्र शासनाने सन 2015 पासून सुकन्या समृद्धी योजना 2022 या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरु केली आहे. वाचक मित्रहो या लेखात आपण सुकन्या समृद्धी योजना संबंधित संपूर्ण महत्वपूर्ण माहिती जसेकी या योजनेचे लाभ, योजनेला लागणारी आवश्यक कागदपत्रे, या योजनेचा उद्देश काय आहे, तसेच अर्जा संबंधित माहिती इत्यादी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
{tocify} $title={Table of Contents}
सुकन्या समृद्धी योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी
केंद्र सरकार विविध
योजनांच्या माध्यमातून देशातील गरजू नगरिकांना आर्थिक मदत किंवा सहाय्य करत असते,
या योजना नागरिकांचे सर्वांगीण कल्याण आणि विकास साधण्यासाठी राबविल्या जातात,
तसेच या योजनांच्या माध्यमातून गरीब व साधारण जनतेचे जीवनमान उंचावणे त्यांना
त्यांच्या अडचणीच्या वेळेस आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आणि तसेच देशातील
नागरिकांच्या आरोग्याची काळजी, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण व त्यांच्यासाठी
सामाजिक सुरक्षा निर्माण करणे त्यांचा सर्वांगीण विकास हा उद्देश या योजनांच्या
माध्यमातून शासनाला साध्य करण्याचा असतो. मुलींना उच्च शिक्षण मिळावे, त्यांना
त्यांच्या पायावर उभे राहून स्वावलंबीपणे जीवन जगता यावे तसेच मुलींचे उज्ज्वल
भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, या
योजनांमध्ये अनेक बचत योजना आहे ज्या नागरिकांना आयकर सूट आणि उच्च व्याजदर प्रदान
करतात, जेणेकरून मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने नागरिकांना या
योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे.
सुकन्या समृद्धी योजना 2023 वैशिष्ट्ये (Features)
सुकन्या समृद्धी
योजनेंतर्गत बचत खाते उघडण्यासाठी किमान गुंतवणूक मर्यादा 250/- रुपये आणि कमाल
गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख रुपये आहे, नागरिक या योजनेमध्ये त्यांच्या
आवश्यकतेनुसार आणि योग्यतेनुसार गुंतवणूक करू शकतात. हि गुंतवणूक मुलीच्या उच्च
शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी करता येते, या योजनेच्या माध्यमातून सरकारव्दारे
गुंतवणुकीवर 7.6 टक्के दराने व्याज देण्यात येते. याच्याशिवाय गुंतवणुकीवर या
योजनेच्या माध्यमातून आयकरामध्ये सूट सुद्धा देण्यात येते. या योजनेचा लाभ
मिळविण्यासाठी सर्वप्रथम मुलींच्या पालकांना पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत
बँके मध्ये खाते उघडावे लागेल.
- सुकन्या समृद्धी योजना 2023 अंतर्गत मुलीच्या नावाने खाते उघडल्याच्या तारखेपासून या बचत खात्याची वैधता 21 वर्षा पर्यंत आहे, त्यानंतर ज्या मुलीच्या नावाने बचत खाते आहे तिला योजना परिपक्व झाल्यावर धनराशी दिल्या जाईल.
- या योजनेच्या अंतर्गत मुदतीनंतर म्हणजे मुलगी 21 वर्षाची पूर्ण झाल्यावर बचत खाते बंद न केल्यास वेळोवेळी सूचित केल्याप्रमाणे, बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या नियमाप्रमाणे वर्तमानातील व्याजदराप्रमाणे शिल्लक रकमेवर व्याज जमा होत राहील.
- SSY योजनेंतर्गत जर लाभार्थी मुलीचे वयाच्या 21 वर्ष पूर्ण होण्याआधी लग्न झाले तर सुकन्या समृद्धी बचत खाते आपोआप बंद होईल. सुकन्या समृद्धी योजना बचत खात्याची वैधता 21 वर्ष असली तरी, या बचत खात्यात 14 वर्षासाठी धनराशी जमा केल्या जाते, आणि त्यानंतर जमा असलेल्या धनराशीवर व्याज मिळत राहते.
- SSY अंतर्गत या बचत खात्यावरील किमान आवश्यक निर्धारित रक्कम 1000/- रुपयांवरून 250/- करण्यात आली आहे, मुलीच्या पालकाने हि किमान आवश्यक निर्धारित रक्कम बचत खात्यामध्ये भरणे आवश्यक आहे, अन्यथा बचत खाते सक्रीय मानले जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये वार्षिक 50 दंड भरून सुकन्या समृद्धी खाते पुन्हा सुरु केले जाऊ शकते, परंतु किमान आवश्यक निर्धारित रक्कम सुद्धा भरावी लागेल.
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खातेधारक मुलगी 21 वर्ष वयाची पूर्ण होण्याआधी म्हणजे योजनेचा मॅच्युरीटी कालावधी पूर्ण होण्याआधी बचत खात्यातून रक्कम काढू शकते, परंतु मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत एकूण जमा रकमेपैकी 50 टक्केच रक्कम काढू शकेल. तसेच हि काढलेली रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणसाठी किंवा तिच्या लग्नासाठी खर्च करणे आवश्यक आहे.
- मुलगी 18 वर्षे वयाची पूर्ण झाल्यावर रक्कम काढते वेळी हे निश्चित करणे अनिवार्य आहे कि बचत खात्यामध्ये कमीत कमी 14 वर्षाची बचत ठेव जमा असेल.
- सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत पालक किंवा कायदेशीर संरक्षक एका मुलीच्या नावाने एकाच बचत खाते उघडू शकतात, तसेच दोन मुली असल्यास केवळ दोन मुलींच्या नावाने वेगवेगळे बचत खाते उघडल्या जाऊ शकतात. परंतु जर एक मुलगी असतांना दुसऱ्या वेळेस जुळ्या मुलींचा जन्म झाला तर अशा परिस्थितीत तिन्ही मुलींच्या नावाने बचत खाते उघडल्या जाऊ शकते.
- सुकन्या समृद्धी योजनेचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे या योजनेंतर्गत आयकर सूट दिल्या जाते, योजनेंतर्गत बचत खात्यात जमा करण्यात येणारी रक्कम आणि मॅच्युरीटी नंतरच्या धनराशीला आयकर अधिनियम 80C च्या अंतर्गत सूट प्राप्त आहे.
सुकन्या समृद्धी योजना 2022 Highlights
योजना | सुकन्या समृद्धी योजना |
---|---|
व्दारा सुरुवात | भारत सरकार |
सुरु करण्याची तारीख | 22 जानेवारी 2015 |
लाभार्थी | 10 वर्षा खालील मुलीं |
योजनेचा उद्देश्य | देशातील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी |
विभाग | महिला व बाल विकास विभाग |
अर्ज करण्याचे माध्यम | इंडिया पोस्ट / बँक |
प्रकार | लघु बचत योजना |
माझी कन्या भाग्यश्री योजना
SSY अंतर्गत किती मुलींना योजनेचा लाभ मिळू शकतो ?
![]() |
सुकन्या समृद्धी योजना 2023 उद्दिष्टे
सुकन्या समृद्धी योजना 2023 नवीन अपडेट्स
सुकन्या समृद्धी योजना
डिजिटल खाते
IPPB मोबाईल अप्प्लीकेशनची
सुविधा
सुकन्या समृद्धी योजना नवीन
नियम
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मिळणारे लाभ
केंद्र सरकारच्या सुकन्या
समृद्धी योजनेचे नागरिकांना अनेक लाभ होत आहे, त्यापैकी महत्वपूर्ण लाभ
खालीलप्रमाणे आहेत.
- शासनाच्या सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होते त्याचबरोबर मुलींचे भविष्य सुरक्षित होऊन तीला स्वावलंबी होण्यास मदत होते.
- या योजनेंतर्गत खातेधारकांना ठेवीवर उत्तम व्याजदर देण्यात येतो
- हि बचत योजना शासनाची असल्यामुळे नागरिकांचे पैसे बुडण्याची शक्यता नाही आणि या योजनेत सरकारकडून नागरिकांच्या पैशाची हमी घेतल्या जाते.
- हि योजना मुलींचे आरोग्य, मुलींचे शिक्षण, मुलींचे लग्न आणि तिच्या सुरक्षित उज्ज्वल भविष्यासाठी हि शासनाची एक सर्वोत्तम योजना आहे, आणि देशातील प्रत्येक परिवारातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो.
- सुकन्या समृद्धी योजनेचे बचत खाते कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा भारतीय पोस्ट ऑफिस यांच्या माध्यमातून देशभरात कुठेही उघडता येते, आणि या योजनेचा लाभ घेता येतो.
- या योजनेचा फायदा म्हणजे या योजनेचा परिपक्वतेचा कालावधी 21 वर्षाचा असला तरीही खातेधारकांना यामध्ये फक्त 14 वर्षा पर्यंत पैसे भरावे लागतात आणि त्यानंतर जमा असलेल्या रकमेवर उर्वरित कालावधीत व्याज जमा होत राहते.
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत जमा करण्यात येणारी रक्कम आणि बचत खात्यात जमा असलेली रक्कम यावर आयकर नियमानुसार धारा 80C च्या अंतर्गत सूट प्राप्त आहे.
- या योजनेंतर्गत पालक किंवा संरक्षक पालक आपल्या परिवारातील दोन मुलींच्या नावाने बचत खाते उघडू शकतात तसेच जुळ्या मुली झाल्यास तसे प्रमाण देऊन तीन मुलींच्या नावाने बचत खाते उघडू शकतात.
- सुकन्या समृद्धी योजना (SSY) एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे, आणि मुख्य म्हणजे हि बचत योजना खातेदारांना चक्रवाढ व्याजाचा लाभ देते, त्यामुळे खातेधारकांनी या योजनेमध्ये कमी गुंतवणूक केली तरीही त्यांना दीर्घकाळात उत्तम परतावा मिळतो.
- योजनेंतर्गत जर मुलगी 18 वर्ष वयाची झाल्यावर किंवा इयत्ता 10 वी पास उत्तीर्ण असेल तर तिच्या पुढील शिक्षणासाठी बचत खात्यातून 50 टाके रक्कम काढता येईल, या योजनेंतर्गत पैसे एकत्रित मिळू शकतात किंवा हप्त्याने सुद्धा मिळू शकतात, पैसे वर्षातून एकदाच आणि जास्तीत जास्त पाच वर्षासाठी हप्त्यांमध्ये घेता येतात.
- या योजनेंतर्गत खातेधारक मुलीचा जर दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, पालक किंवा कायदेशीर पालक बचत खात्यात जमा केलेली रक्कम काढू शकतात. हि रक्कम नॉमिनी व्यक्तीच्या खात्यात त्वरित जमा केली जाईल, यासाठी पालकांना किंवा कायदेशीर पालकांना खातेधारकाच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील ज्याची संबंधित अधिकाऱ्याकडून पडताळणी केली जाईल.
- सुकन्या समृद्धी योजना या योजनेंतर्गत खातेधारक मुलगी 18 वर्षे वयाची पूर्ण झाल्यावर तिचे बचत खाते व्यवस्थापित करू शकते, यामध्ये खातेधारक मुलीला, तिचे खाते असेलेल्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यानंतर मुलगी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते व्यवस्थापित करू शकते.
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत व्याज किती मिळते ?
सुकन्या समृद्धी
योजनेंतर्गत खाते बदलविण्याची प्रक्रिया
सुकन्या समृद्धी योजना
अंतर्गत तुम्ही जर तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडले असेल आणि
काही कारणास्तव तुम्ही दुसऱ्या शहरात शिफ्ट होत असाल, तर तुम्ही मुलीच्या नावाचे
सुकन्या समृद्धी खाते सहजपणे ट्रान्सफर करू शकता. जर तुम्ही तुमच्या मुलीच्या
नावाने कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी खाते उघडले असेल, आणि तुम्ही
जिथे जात असाल तिथे जवळपास कोणतेही पोस्ट ऑफिस नसेल तर तुम्ही ते बचत खाते बँकेतही
ट्रान्सफर करू शकता. तसेच तुमचे सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही एका बँकेत
असल्यास, तुम्ही सुकन्या समृद्धी खाते नवीन ठिकाणी इतर कोणत्याही बँकेत ट्रान्सफर
करू शकता. तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावाचे सुकन्या समृद्धी खाते एका बँकेतून
दुसऱ्या बँकेत किंवा एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करायचे
असल्यास, खालीलप्रमाणे प्रक्रिया असेल.
- यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला सुकन्या समृद्धी खाते ट्रान्सफर करण्याची विनंती करणारा फार्म भरावा लागेल, ट्रान्सफर विनंती फॉर्मसाठी तुम्हाला बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागेल, जिथे बचत खाते उघडले आहे, त्यानंतर ज्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते ट्रान्सफर केले जाणार आहे त्या बँकेचे नाव आणि पत्ता अर्जावर नमुद करणे आवश्यक आहे.
- त्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे सुकन्या समृद्धी खाते असलेल्या बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल आणि ट्रान्सफर विनंती फॉर्म आणि बचत खाते पासबुक सबमिट करावे लागेल, SSY खाते ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी, मूळ पासबुक आणि ट्रान्सफर विनंती फॉर्म सबमिट करणे अनिवार्य आहे.
- यानंतर ज्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सध्या सुकन्या समृद्धी खाते आहे ते सबमिट केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करेल, आणि विद्यमान सुकन्या समृद्धी योजना खाते बंद करून ट्रान्सफर विनंतीवर प्रक्रिया केली जाईल. सुकन्या समृद्धी खात्याशी संबंधित सर्व कागदपत्रे खातेधारकाला दिली जातील. कागदपत्रे नवीन बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करणे आवश्यक आहे.
- त्यानंतरची स्टेप म्हणजे नवीन पोस्ट ऑफिस किंवा बँकेला भेट देणे आणि कागदपत्रे जमा करणे, सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे आणि बचत खाते ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहकाने KYC कागदपत्रे, फोटो आणि नमुना स्वाक्षरी सादर करणे आवश्यक आहे.
- यानंतर तुम्हाला नवीन बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून एक पासबुक दिल्या जाईल ज्यामध्ये तुमच्या बचत खात्याची जमा धनराशी दिसेल. अशा प्रकारे तुमचे सुकन्या समृद्धी योजना खाते ट्रान्सफर होईल आणि नंतर तुम्ही खात्याचे संचालन करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना खाते पुन्हा सुरु करण्याची प्रक्रिया
अनेकवेळा पालक सुकन्या
समृद्धी योजना खाते मुलीच्या नावाने उघडतात आणि काही आर्थिक कारणांमुळे किंवा इतर
काही कारणांमुळे त्या खात्यात पैसे टाकायला विसरतात, अशावेळी हे सुकन्या समृद्धी
खाते निष्क्रिय होते, परंतु आता याबद्दल काळजी करायची आवश्यकता नाही, सुकन्या
समृद्धी खाते सहजपणे पुन्हा सक्रीय केले जाऊ शकते, सुकन्या समृद्धी योजना हि
सरकारची मुलींसाठी अतिशय लोकप्रिय योजना आहे. यामध्ये बचत खाते उघडण्यासाठी फक्त
250/- रुपये लागतात. हे खाते सक्रीय ठेवण्यासाठी दरवर्षी किमान एवढी रक्कम जमा करावी
लागते, योजनेच्या नियमानुसार जर हि रक्कम जमा केली नाही तर ते खाते डिफॉल्ट समजल्या
जाते, अशा परिस्थितीत हे खाते निष्क्रिय होते. ते खाते पुन्हा सक्रीय करणे सोपे
आहे त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील.
- सुकन्या समृद्धी खाते पुन्हा सुरु करण्यासाठी, तुम्हाला जिथे तुमचे सुकन्या समृद्धी खाते उघडले आहे त्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत जावे लागेल, यानंतर तुम्हाला तुमचे बचत खाते पुन्हा सक्रीय करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतर थकबाकीची रक्कम भरावी लागेल, म्हणजेच ज्यावर्षी तुम्ही पैसे भरले नाहीत, त्यासाठी किमान 250/- रुपये भरावे लागतील.
- यासाठी 250/- रुपये भरण्याबरोबरच दरवर्षीप्रमाणे 50/- रुपये दंड सुद्धा भरावा लागेल, समजा आपण असे समजू कि बचत खाते तीन वर्षापासून सक्रीय नाही, अशा परिस्थितीत 750/- रुपये आणि 150/- रुपये दंडासह तीन वर्षासाठी 900/- रुपये भरावे लागतील. अशा प्रकारे तुमचे सुकन्या समृद्धी बचत खाते पुन्हा सक्रीय केले जाईल.
- यामध्ये जुन्या नियमांनुसार पोस्ट ऑफिस बचत खात्यासाठी लागू असलेल्या दराने डिफॉल्ट खात्यांवर व्याज आकारले जात होते. नवीन नियमांनुसार सुकन्या समृद्धी खाते पुन्हा सक्रीय न केल्यास, डिफॉल्ट खाते परीपक्वतेपर्यंत योजनेसाठी लागू असलेल्या दराने व्याज मिळवत राहील
- सुकन्या समृद्धी खात्याच्या तुलनेत पोस्ट ऑफिस बचत खात्याचा व्याज दर खूपच कमी आहे. जिथे सध्या पोस्ट ऑफिस बचत खात्यांवर व्याजदर 4 टक्के आहे. आणि तसेच सुकन्या समृद्धी योजना खात्यावर 7.6 टक्के व्याजदर मिळत आहे.
सुकन्या समृद्धी योजनेवर कर्ज मिळते काय ?
सुकन्या समृद्धी योजना बचत
खात्यावर वर्तमान नियमांनुसार कोणतेही कर्ज घेतले जाऊ शकत नाही, त्यामुळे सुकन्या
समृद्धी खात्यात कर्ज घेण्याच्या उद्देशाने सुरक्षा ठेव ठेवली जाऊ शकत नाही, हि
तरतूद सध्या सुकन्या समृद्धी योजनेसाठी अस्तित्वात नाही. अनेक ठेव योजना
गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवी तारण ठेवण्याची आणि त्यावर कर्ज घेण्याची परवानगी
देतात. सुकन्या समृद्धी योजनेच्या अटीं आणि शर्तीनुसार बचत खात्यात असलेल्या
गुंतवणुकीवर तुम्ही कर्ज घेऊ शकत नाही.
परंतु मुलीचे वय 18 वर्षे
पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदारांकडे नेहमी आंशिक पैसे काढण्याचा पर्याय असतो, या
योजनेंतर्गत खातेधारक जमा झालेल्या रकमेच्या 50 टक्केपर्यंत रक्कम काढू शकतो,
मात्र हि काढलेली रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि इतर मुली संबंधित
कारणांसाठी वापरली जावी. ज्यांना त्यांच्या मुलींच्या भविष्याचे आर्थिक संरक्षण
करायचे आहे त्यांच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना खाते हि एक परिपूर्ण योजना आहे.
सुकन्या समृद्धी योजना प्रमुख मुद्दे
मुलींचे भविष्य सुरक्षित
करण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने हि योजना सुरु केली आहे
योजनेंतर्गत मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आणि पुढे भविष्यात लग्नासाठी गुंतवणूक
करता येते, सुकन्या समृद्धी योजना हि देशातील मुलींची उन्नती करण्याच्या उद्देशाने
सुरु करण्यात आली आहे, तसेच सुकन्या समृद्धी बचत खाते योजना प्रत्येक कुटुंबातील
मुलींना बचतीचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा
कार्यकाळ खाते उघडल्यापासून 21 वर्ष किंवा मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर
तिचे लग्न होईपर्यंत.
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे बचत खाते उघडता येते
- योजनेंतर्गत बचत खाते राष्ट्रीयकृत बँकेत किंवा भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये उघडल्या जाऊ शकते
- गुंतवणूकदार मुलीच्या नावाने एकाच खाते उघडू शकतो आणि चालवू शकतो, पालक किंवा कायदेशीर पालक फक्त दोन मुलींसाठी खाते उघडू शकतात. जुळ्या मुलींसाठी पुरावा सादर केल्यावर तिसरे खाते उघडण्याची परवानगी दिली जाईल.
- या योजनेंतर्गत हे खाते 250/- रुपयांच्या सुरवातीच्या ठेवीसह उघडले जाऊ शकते आणि एका आर्थिक वर्षात किमान 250/- रुपये किंवा जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार जमा करता येतील.
- हे बचत खाते उघडल्यापासून चौदा वर्षापर्यंत खात्यात रक्कम जमा करता येते, आणि खात्यात किमान रक्कम जमा झाली नसेल तर किमान ठेव रकमेसह 50/- रुपये वार्षिक दंडासह खाते नियमित करता येते.
- हे खाते मुलगी वयाची दहा वर्ष पूर्ण करेपर्यंत पालकांकडून खाते उघडण्यात येईल, आणि चालवले जाईल. मुलगी 18 वर्षाची झाल्यावर ती स्वतः खाते चालवू शकते, हे बचत खाते भारतात कुठेही हस्तांतरित केले जाऊ शकते.
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत असलेल्या बचत खात्यातून मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर बचत खात्यात जमा झालेल्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम काढता येईल.
- दुर्दैवाने खातेधारक मुलीचा मृत्यू झाला अशा परिस्थितीत मुलीच्या मृत्यू नंतर पालकांकडून बचत खाते बंद करण्यात येईल आणि पालकांना व्याजासहित जमा असेलेली रक्कम मिळेल.
- या योजनेंतर्गत खाते उघडण्याच्या तारखेपासून एकवीस वर्ष पूर्ण झाल्यवर खाते परिपक्व होईल, जर मुलीचे लग्न एकवीस वर्ष पूर्ण होण्याआधी झाले असेल, तर लग्नाच्या तारखेनंतर खाते चालविण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- या योजनेंतर्गत कलम 80C प्राप्तीकर कायदा अंतर्गत आयकर सूट देखील उपलब्ध आहे, या योजनेव्दारे मिळणारा परतावा सुद्धा करमुक्त आहे.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत अधिकृत बँका
सुकन्या समृद्धी योजनेसाठी
बचत खाती उघडण्यासाठी भारतीय रिझर्व बँक व्दारे अधिकृत केलेल्या एकूण 28 बँका
आहेत. गुंतवणूकदार खालीलपैकी कोणतीही बँक निवडून सुकन्या सामृद्धी योजनेचे बचत
खाते उघडू शकतात, आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- अलाहाबाद बँक
- अॅक्सिस बँक
- आंध्र बँक
- बँक ऑफ महाराष्ट्र
- बँक ऑफ इंडिया
- कॉर्पोरेशन बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- कॅनरा बँक
- देना बँक
- बँक ऑफ बडोदा
- स्टेट बँक ऑफ पटियाला
- स्टेट बँक ऑफ मैसूर
- इंडियन ओव्हरसीज बँक
- इंडियन बँक
- पंजाब नॅशनल बँक
- IDBI बँक
- आयसीआयसीआय बँक
- सिंडिकेट बँक
- स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपूर
- स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
- ओरियेंटल बँक ऑफ कॉमर्स
- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
- पंजाब आणि सिंध बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- युको बँक
- विजय बँक
सुकन्या समृद्धी कॅल्क्युलेटर
- कॅल्क्युलेटर तुम्ही भरलेल्या रकमेच्या आधारावर तुम्हाला मॅच्यूरीटीच्या वेळी मिळणाऱ्या रकमेची अंदाजे गणना करते. खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षे पूर्ण झाल्यावर योजना परिपक्व होईल.
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत योजनेच्या नियमांनुसार खाते उघडण्याच्या तारेखेपासून 14 वर्ष होईपर्यंत ठेवीदारांनी या बचत खात्यात गुंतवणूक करणे आवश्यक आहे, या ठिकाणी कॅल्क्युलेटर असे गृहीत धरतो कि तुम्ही निवडलेली रक्कम दरवर्षीप्रमाणे बचत खात्यात गुंतवणूक केली आहे.
- या योजनेमध्ये 14 व्या वर्षी 21 व्या वर्षाच्या दरम्यान, या बचत खात्यात कोणतीही गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही, कारण त्या पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याज मिळेल. कॅल्क्युलेटर त्या वर्षांमध्ये तुम्हाला मिळणारे व्याज विचारात घेतो.
- यामध्ये तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावर, कॅल्क्युलेटर तुम्हाला बचत खाते कोणत्या वर्षात परिपक्व होते, मॅच्यूरीटी व्हॅल्यू, व्याजदर दाखवेल ज्याचा वापर करून मॅच्यूरीटी व्हॅल्यू निघाली आहे. तुम्ही या योजनेत मासिक गुंतवणूक करू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेच्या रिटर्न्सची गणना
Deposit / Year | Interest Rate @7.6 (Approx.) | Closing Balance (Approx.) |
---|---|---|
Rs. 50,000 | Rs. 3,800 | Rs. 53,800 |
Rs. 50,000 | Rs. 7,889 | Rs. 1,11,689 |
Rs. 50,000 | Rs. 12,288 | Rs. 1,73,977 |
Rs. 50,000 | Rs. 17,022 | Rs. 2,40,999 |
Rs. 50,000 | Rs. 22,116 | Rs. 3,13,115 |
Rs. 50,000 | Rs. 27,597 | Rs. 3,90,712 |
Rs. 50,000 | Rs. 33,494 | Rs. 4,74,206 |
Rs. 50,000 | Rs. 39,840 | Rs. 5,64,046 |
Rs. 50,000 | Rs. 46,667 | Rs. 6,60,713 |
Rs50,000 | Rs. 54,014 | Rs. 7,64,728 |
Rs. 50,000 | Rs. 61,919 | Rs. 8,76,647 |
Rs. 50,000 | Rs. 70,425 | Rs. 9,97,072 |
Rs. 50,000 | Rs. 79,577 | Rs. 11,26,650 |
Rs. 50,000 | Rs. 89,425 | Rs. 12,66,075 |
Rs 0 | Rs. 96,222 | Rs. 13,62,297 |
Rs. 0 | Rs. 1,03,535 | Rs. 14,65,831 |
Rs. 0 | Rs. 1,11,403 | Rs. 15,77,234 |
Rs. 0 | Rs. 1,19,870 | Rs. 16,97,104 |
Rs. 0 | Rs. 1,28,980 | Rs. 18,26,084 |
Rs. 0 | Rs. 1,38,782 | Rs. 19,64,867 |
Rs. 0 | Rs. 1,49,330 | Rs. 21,14,196 |
4 वर्षासाठी 50,000/- रुपयाच्या वार्षिक ठेवींच्या आधारावर, सुकन्या समृद्धी मिळालेले व्याज 14,14,196/- रुपये आणि 21,14,196/- रुपये याप्रमाणे परिपक्वता धनराशी मिळेल.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी
पात्रता
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षापेक्षा अधिक नसावे, मोठया रकमेचा खर्च न करिता आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू पाहणाऱ्या नागरिकांसाठी हि योजना एक उत्तम पर्याय आहे.
- केवळ मुलीच सुकन्या समृद्धी बचत खाते उघडण्यास पात्र आहेत, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत बचत खाते केवळ मुलीच्या नावाने पालक किंवा कायदेशीर पालक उघडू शकतात.
- सुकन्या समृद्धी योजना बचत खाते उघडतांना मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे, मुलीच्या वयाचा पुरावा जोडावा लागेल.
- एका मुलीसाठी एकापेक्षा जास्त सुकन्या समृद्धी बचत खाते उघडता येत नाही, एक कुटुंबातील केवळ दोन सुकन्या समृद्धी खाते म्हणजेच प्रत्येक मुलीसाठी एक खाते उघडण्याची परवानगी आहे. यामध्ये समृद्धी बचत खाते काही विशेष प्रकरणांमध्ये उघडले जाऊ शकते.
- जुळ्या किंवा तिळ्या मुलींच्या जन्मापूर्वी एका मुलीचा जन्म झाला असेल किंवा तीन मुली आधी एकत्र जन्माला आली असेल तर अशा परिस्थितीत तिसरे खाते उघडता येते.
- यामध्ये जुळ्या किंवा तिप्पटांचा जन्मनंतर मुलीचा जन्म झाल्यास तिसरे SSY खाते उघडता येत नाही.
सुकन्या समृद्धी योजना आवश्यक कागदपत्रे
ज्या नागरिकांना त्यांच्या
मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना बचत खाते उघडायचे आहे त्यांनी खालीलप्रमाणे
आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र :- पालकांनी किंवा कायदेशीर पालकांनी संबंधित मुलीच्या जन्माचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे, हे जन्म प्रमाणपत्र मुलीचा जन्म झालेल्या रुग्णालयातून किंवा सरकारी एजन्सीमार्फत मिळू शकते.
- पालक किंवा कायदेशीर पालकांचा पत्ता पुरावा :- मुलीसाठी हे खाते उघडू इच्छिणाऱ्या पालकांनी खाते उघडण्यासाठी त्यांच्या वास्तव्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. हा पुरावा खालीलप्रमाणे असू शकतो.
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- रेशन कार्ड
- वीज बिल / टेलिफोन बिल
- आधार कार्ड
सुकन्या समृद्धी योजना बदल झालेले पाच नियम
सुकन्या समृद्धी योजनेला
अधिक फायदेशीर आणि सुलभ करण्यासाठी केंद्र शासनाने या योजनेत काही बदल करून
योजनेला सुधारित करण्यात आली आहे, केंद्र शासनाने या योजनेत पाच प्रकारचे बदल केले
आहे त्यामळे आता या योजनेत गुंतवणूक करणे तसेच योजनेचे बचत खाते बंद करणे अधिक
सुलभ करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे बचत
खाते ऑपरेट करण्याच्या वयामध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे.
सुकन्या समृद्धी योजना डिफॉल्ट होणार नाही :- सुकन्या समृद्धी योजना बचत खात्यामध्ये दरवर्षी किमान 250/- रुपये आणि कमाल 1.5 लाख गुंतवणूक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये अगोदर सुकन्या समृद्धी बचत खात्यामध्ये किमान रक्कम जमा करण्यात आली नाही तर बचत खाते डिफॉल्ट समजण्यात येत होते, परंतु बदलेल्या नियमांनुसार बचत खात्यामध्ये किमान रक्कम जमा करण्यात आली नाही तरीही खाते डिफॉल्ट घोषित होणार नाही. आणि त्यानंतर बचत खात्याला पुन्हा सक्रीय करण्यात आले नाही तरीही बचत खाते परिपक्व होईपर्यंत वर्तमान व्याजदरानुसार जमा असेलेल्या रकमेवर व्याज जमा होत राहील.
तिसऱ्या मुलीच्या बचत
खात्यावर आयकर सूट मिळेल :- या योजनेमध्ये सुरुवातीला दोन मुलींच्या बचत खात्यांवर आयकर
नियम 80C च्या अंतर्गत सूट प्राप्त होती, परंतु तिसऱ्या मुलीसाठी हि आयकर सूट मिळत
नव्हती, नवीन नियमांनुसार एक मुलगी असल्यानंतर जर दुसऱ्या वेळेस जुळ्या मुलींचा
जन्म झाला तर तिन्ही मुलींचे बचत खाते उघडता येईल व खात्यांवर आयकर सूट सुद्धा
मिळेल.
सुकन्या समृद्धी खाते मुदतपूर्व
बंद करणे :- या योजनेच्या नवीन
नियमांनुसार योजनेंतर्गत मुलीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर किंवा खातेदाराचे गंभीर
आजार किंवा खात्याची देखरेख करण्याऱ्या पालकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाऊ
शकते, यासाठी रीतसर भरलेल्या अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले मृत्यू
प्रमाणपत्र सादर केल्यावर पालकाला खात्यातील शिल्लक रक्कम आणि मृत्युच्या
तारखेपर्यंत त्यावरील व्याजाची रक्कम दिली जाईल. खातेदाराच्या मृत्यूची तारीख आणि
खाते बंद करण्याच्या तारखेदरम्यान खात्यात ठेवलेल्या रकमेवर पोस्ट ऑफिस बचत
खात्यांवर लागू असलेल्या दराने व्याज दिले जाईल.
सुकन्या समृद्धी खात्याचे
संचालन :- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत शासनाच्या नवीन नियमांनुसार ज्या मुलीच्या नावाने
सुकन्या समृद्धी बचत खाते आहे, ती मुलगी वयाची 18 वर्षे पूर्ण केल्याशिवाय
तिच्या बचत खात्याचे संचालन करू शकत नाही,
सुरवातीला हे वय 10 वर्षे होते. यामध्ये मुलचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर
पालकांना त्या संबंधित कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागतील.
सुकन्या समृद्धी
योजनेंतर्गत आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज :-
सुकन्या समृद्धी योजनेच्या
नवीन नियमांनुसार सुकन्या समृद्धी खात्यावरील व्याज आता आर्थिक वर्षाच्या शेवटी
जमा केल्या जाईल, त्यासोबत सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्याचे वार्षिक व्याज येथे
जोडले जाईल. सुकन्या समृद्धी खात्यात चुकीच्या पद्धतीने जमा झालेले व्याज वापस
करण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे.
सुकन्या समृद्धी योजना व्याजदर 2023
1 एप्रिल 2014 पासून | 9.1% |
---|---|
1 एप्रिल 2015 पासून | 9.2% |
1 एप्रिल 2016 ते 30 जून 2016 | 8.6% |
1 जुलै 2016 ते 30 सप्टेंबर 2016 | 8.6% |
1 ऑक्टोबर 2016 ते 31 डिसेंबर 2016 | 8.5% |
1 जानेवारी 2018 ते 31 मार्च 2018 | 8.3% |
1 एप्रिल 2018 ते 30 जून 2018 | 8.1% |
1 जुलै 2018 ते 30 सप्टेंबर 2018 | 8.1% |
1 ऑक्टोबर 2018 ते 31 डिसेंबर 2018 | 8.5% |
1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2019 | 8.5% |
1 एप्रिल 2019 ते 30 जून 2019 | 8.5% |
1 जानेवारी 2020 ते 31 मार्च 2020 | 8.4% |
1 एप्रिल 2020 ते 30 जून 2021 | 7.6% |
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कर लाभ
या योजनेंतर्गत उघडलेल्या
बचत खात्यात अनेक कर लाभ प्रदान केले आहेत जे खालीलप्रमाणे आहेत.
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत बचत खात्यावरील व्याज वार्षिक आधारावर बचत खात्यात जमा केले जाते, या बचत खात्यात जमा करण्यात येणाऱ्या रकमेवर आणि जमा झालेल्या व्याजावर कोणतेही कर आकारले जात नाही, त्यामुळे गुंतवणूकदरांना अधिक धनराशी प्राप्त होते.
- सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत केलेली सर्व गुंतवणूक हि आयकर कलम 80C च्या अंतर्गत कर कपातीच्या लाभासाठी पात्र आहे, सशर्त कमाल 1.5 लाख रुपये.
- गुंतवणुकीवर जमा होणारे व्याज देखील कर सूट मिळण्यास पात्र आहे
- परीपक्वतेवर प्राप्त होणारी रक्कम किंवा काढलेली रक्कम देखील करमुक्त आहे.
सुकन्या समृद्धी योजना पासबुक
- सुकन्या समृद्धी योजना बचत खाते उघडल्यानंतर ग्राहकांना पासबुक दिल्या जाते, योजनेंतर्गत पासबुक कोणत्याही शुल्काशिवाय प्रदान केले जाते.
- या बचत खाते पासबुकामध्ये नाव, जन्मतारीख, खातेधारकाचा पत्ता, खाते क्रमांक, खाते उघडण्याची तारीख आणि जमा केलेली रक्कम असे विधिवत तपशील असतात.
- हे खाते पासबुक कोणत्याही ठेवींच्या वेळी किंवा खाते बंद करतांना सबमिट केले जाणे आवश्यक आहे.
- बचत खात्याचे पासबुक नियमितपणे अपडेट केल्यास त्याच्या माध्यमातून देखील जमा रक्कम तपासली जाऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजना नियम व अटी
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत किमान 250/- रुपयांमध्ये बचत खाते उघडली जाऊ शकते
- या योजनेंतर्गत खातेधारकांना कमीत कमी 250/- रुपये दरवर्षीप्रमाणे योजनेत गुंतवावे लागतील
- या योजनेंतर्गत खातेधारकांनी 250/- रुपये वार्षिक किमान गुंतवणूक केली नाही, तर या स्थितीत बचत खाते डिफॉल्ट होईल, जर खाते डिफॉल्ट झाले असेल तर अशा प्रकरणात किमान रक्कम 250/- रुपये आणि वार्षिक 50/- रुपये दंड भरून खाते पुन्हा सक्रीय केले जाऊ शकते.
- सुकन्या समृद्धी योजना खाते मुलीचे वय 10 वर्षे होण्यापूर्वी पालकांव्दारे उघडले जातात
- या योजने अंतर्गत मुलीसाठी एकच खाते उघडता येते, या योजनेंतर्गत फक्त दोन मुलीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- जर जुळ्या किंवा तिहेरी मुलींचा जन्म झाला असेल तर अशा वेळेस तिन्ही मुलींच्या नावाने खाते उघडता येते
- सुकन्या समृद्धी बचत खाते मुलींच्या पालकांव्दारे मुलीचे वय 18 वर्षाचे पूर्ण होईपर्यंत चालविले जाते
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत जास्तीत जास्त 1,50,000/- रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते
- सुकन्या समृद्धी योजना बचत खाते उघडण्यासाठी पालकांना अर्ज, मुलींचे जन्म प्रमाणपत्र, आणि पालकाचे आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- या योजनेंतर्गत बचत खाते उघडण्याच्या तारखेपासून 14 वर्षापर्यंत योजनेच्या खात्यात गुंतवणूक केली जाऊ शकते.
- सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत योजना खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी किंवा मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी परिपक्व होईल
- या योजनेंतर्गत व्याजदर त्रैमासिक आधारावर सरकारव्दारे अधिसूचित केले जाईल, या योजनेंतर्गत वर्तमानातील व्याजदर 7.6% आहे.
- या योजनेंतर्गत व्याजाची रक्कम आर्थिक वर्षाच्या शेवटी बचत खात्यात जमा केल्या जाईल. सुकन्या समृद्धी खाते पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येते.
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत केलेली गुंतवणूक आयकर कायदा कलम 80C च्या अंतर्गत करमुक्त आहे, या योजनेच्या अंतर्गत मिळणारे व्याज आणि परिपक्व रक्कम देखील करमुक्त आहे
- सुकन्या समृद्धी योजना खाते मुदत पूर्व बंद केल्या जाऊ शकते, खाते उघडल्यानंतर पाच वर्षांनी
- जर खातेधारकाचा मृत्यू झाला तर अशा परिस्थतीत हे खाते बंद केले जाऊ शकते
- खातेधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा खातेधारकाला कोणताही गंभीर आजार झाल्यास अशा परिस्थितीत हे बचत खाते बंद केले जाऊ शकते
- या योजनेंतर्गत मुलीच्या बचत खात्याची देखरेख करणाऱ्या पालकाचा मृत्यू झाल्यास, अशा परस्थितीत देखील बचत खाते बंद केले जाऊ शकते.
- सुकन्या समृद्धी योजनेच्या बचत खात्यातून खातेधारक मुलीच्या शिक्षणसाठी किंवा लग्नासाठी रक्कम काढली जाऊ शकते, या योजनेंतर्गत बचत खात्यात जमा असलेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम काढली जाऊ शकते.
- या योजनेंतर्गत बचत खात्यातून रक्कम काढण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे, मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर बचत खात्यातून रक्कम काढली जाऊ शकते. हि रक्कम खात्यातून एकाचवेळी किंवा हप्त्यांमध्ये सुद्धा काढली जाऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजना 2023 अर्ज प्रक्रिया
केंद्र शासनाने सुकन्या समृद्धी योजना हि बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत सुरु केली आहे या योजनेच्या
अंतर्गत मुलींचे पालक आपल्या मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करू शकतात,
यासाठी या योजनेच्या अंतर्गत मुलीच्या नावाने बचत खाते उघडल्या जाते, हे सुकन्या
समृद्धी बचत खाते उघडतांना काही महत्वपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे, सुकन्या
समृद्धी योजनेमध्ये मुलीच्या नावाने गुंतवणूक करणारे पालक किंवा कायदेशीर संरक्षक
यांची माहिती देणे आवश्यक आहे, या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बचत खाते
उघडण्यासाठी खालीलप्रमाणे महत्वपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
- मुलीचे नाव
- बचत खाते उघडणाऱ्या पालकांचे, कायदेशीर पालकांचे नाव
- चेक / DD क्रमांक आणि तारीख
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- पालकांचे ओळखपत्र (ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इत्यादी)
- वर्तमानातील आणि कायमचा पत्ता ( पालकांच्या ओळखपत्रानुसार)
- त्यानंतर KYC कागदपत्र (पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र)
- तसेच सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज डाऊनलोड करू शकतात किंवा तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मिळवू शकता.
- त्यानंतर वरीलप्रमाणे अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून अर्जाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रांची प्रत जोडावी आणि कागदपत्रांसह अर्ज बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा.
- यानंतर पोस्ट ऑफिस / बँकेकडून या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल
- यानंतर सुकन्या समृद्धी योजना बचत खात्यामध्ये किमान राशी 250/- रुपये भरून खाते उघडावे लागेल. त्यानंतर अर्जदाराल एक पासबुक देण्यात येईल, यानंतर अर्जदार या बचत खात्यात गुंतवणूक करू शकतात.
- अशा प्रकारे नागरिक सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना : Click Hereसुकन्या समृद्धी योजना अर्ज : Click Hereसुकन्या समृद्धी पोस्ट ऑफिस अर्ज : Click Hereऑफिशियल वेबसाईट : Click Here
सुकन्या समृद्धी योजना FAQ
Q. सुकन्या समृद्धी
योजनेमध्ये किती रक्कम भरावी लागते आणि किती काळ ?
सुकन्या समृद्धी
योजनेंतर्गत सुरवातीला किमान रक्कम 1000/- रुपये बचत खात्यात भरावे लागत होते,
यानंतर शासनाने हि रक्कम कमी करून 250/- रुपये किमान रक्कम केली, या योजनेंतर्गत
250/- रुपये ते 1.50,000/- रुपये पर्यंत वार्षिक गुंतवणूक करता येते. या
योजनेंतर्गत बचत खाते उघडल्यानंतर 14 वर्षासाठी गुंतवणूक करणे आवश्यक असते.
Q. सुकन्या समृद्धी योजना
खात्यात पैसे कसे जमा करावे ?
सुकन्या समृद्धी योजना
खात्यात रक्कम कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट या पद्धतीने किंवा बँकेला जी पद्धत मान्य
आहे, सुकन्या समृद्धी योजना खात्यात इलेक्ट्रोनिक ट्रान्स्फर पद्धतीने सुद्धा
रक्कम जमा केल्या जाऊ शकते, परंतु त्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कोर बँकिंग
सिस्टिम असायला पाहिजे. जर बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कोर बँकिंग सिस्टिम उपलब्ध
आहे तर तुम्ही पोस्ट पेमेंट बँक खात्यातून या योजनेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर
करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे सेविंग खाते IPPB खात्याबरोबर जोडावे लागेल,
त्यानंतर तुम्हला DOP प्रोडक्ट्स मध्ये जावे लागेल आणि सुकन्या समृद्धी योजना
खात्याला निवडावे लागेल, यानंतर तुम्हाला SSY खाता नंबर आणि DOP कस्टमर आयडी
प्रविष्ट करावी लागेल, यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याची रक्कम निवडावी लागेल,
त्यानंतर प्रोसेस पूर्ण करावी, अशा पद्धतीने खात्यात रक्कम जमा होईल.
Q. सुकन्या समृद्धी
योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी वयाची अट काय आहे ?
सुकन्या समृद्धी योजना
अंतर्गत बचत खाते मुलीच्या जन्मापासून 10 वर्षाच्या आत उघडल्या जाऊ शकते, या योजनेंतर्गत
मुलीचे वय दहा वर्षापेक्षा जास्त असल्यास बचत खाते उघडता येत नाही, या सुकन्या
समृद्धी योजना खात्याची देखरेख मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक करतात.
Q. कोणत्या परिस्थितीत
सुकन्या समृद्धी योजना खाते बंद केले जाऊ शकते ?
सुकन्या समृद्धी
योजनेंतर्गत मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर, लग्नाच्या खर्चासाठी
मुलीकडून SSY खाते मुदतीपूर्व बंद केले जाऊ शकते, आणि विशिष्ट परिस्थितीत संबंधित
रक्कम काढली जाऊ शकते.
खातेदाराचा आकस्मिक मृत्यू
:- या योजनेत नोंदणी केलेल्या मुलीचा जर दुर्दैवी मृत्यू झाल्यास, पालक किंवा
कायदेशीर पालक खात्यात जमा केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज काढू शकतात.
सुकन्या समृद्धी खाते सुरु
ठेवण्यास असमर्थता :- शासनाच्या निर्देशानुसार जर एखादा गुंतवणूकदार बचत खात्यात
गुंतवणूक करण्यास पात्र नाही, तर सुकन्या समृद्धी योजना खाते मुदतीपूर्व बंद
केल्या जाऊ शकते.
Q. SSY खात्यात रक्कम जमा न
केल्यास काय होईल ?
सुकन्या समृद्धी योजना
खात्यात जर एखादा खातेधारक किमान ठेव रक्कम भरू शकला नाही, तर अशा परिस्थितीत
त्याच्या बचत खात्याला डिफॉल्ट समजले जाईल. परंतु या डिफॉल्ट बचत खात्यावरहि
मुदतपूर्तीच्या तारखेपर्यंत, लागू असलेले व्याज जमा होत राहील, तसेच बचत खाते
उघडण्याची 14 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी डिफॉल्ट खात्यामध्ये किमान 250/- रुपये
भरणे आवश्यक आहे. हे बचत खाते 50/- रुपये वार्षिक दंड भरून पुन्हा सुरु केल्या जाऊ
शकते.