महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम 2022 मराठी

महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम 2022 संपूर्ण माहिती मराठी | Maharashtra Pandit Deendayal Upadhyay Credit Society Deposit Protection Scheme 2022 Details In Marathi | पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी जमा सरंक्षण योजना 2022 |  पंडित दीनदयाल उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना मराठी | पंडित दीनदयाल उपाध्याय योजना 2022 | महाराष्ट्र सरकारी योजना 2022

सहकारी पतसंस्थांचा राज्याच्या अर्थ व्यवस्थेत मोठा भाग असतो, महाराष्ट्र राज्यात सुमारे 9000 च्या जवळपास पतसंस्था आहेत या पतसंस्था सर्व राज्यात, ग्रामीण भागात तसेच शहरीभागात पसरलेले आहे या पतसंस्था सूक्ष्म वित्त संस्था म्हणून काम करत असतात. पतसंस्थांचा ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात अर्थव्यवसाय असतो त्याचप्रमाणे शहरी भागातसुद्धा या सहकारी पतसंस्थांचा मोठा अर्थव्यवसाय असतो. या पतसंस्था छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, मजूर, तसेच निन्म मध्यमवर्गीय यांना वित्तीय सेवा देत असतात. वाचक मित्रहो, आपण या लेखामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना या योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

{tocify} $title={Table of Contents}

पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजित प्रोटेक्शन स्कीम 2022 माहिती मराठी

ग्रामीण भागतील तसेच शहरी भागातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, निन्म मध्यम वर्गीय नागरिक. छोटे दुकानदार, मजूर हे मध्यम वर्गीय नागरिक या पतसंस्थांमध्ये छोट्या छोट्या ठेवींच्या स्वरुपात गुंतवणूक करतात, या गुंतवणुकीचा उपयोग हे मध्यम वर्गीय नागरिक मुलांच्या शिक्षणामध्ये तसेच कोणत्याही अडचणीच्या वेळेस त्यांना हि गुंतवणूक उपयोगात पडते, त्याचप्रमाणे लहान दुकानदरांना या छोट्या ठेवी त्यांचा व्यवसाय वाढविण्याच्या उपयोगात पडतात, त्यामुळे त्यांची हि गुंतवणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची असते. 

महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम
महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम 


या सहकारी पतसंस्था कधी कधी आर्थिक अडचणीत सापडतात त्यामुळे निम्न मध्यमवर्गीय नागरिकांचे मोठयाप्रमाणात नुकसान होते आणि त्यांनी गुंतवलेला पैसा त्यांना वेळेवर मिळत नाही, त्यामुळे या पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण मिळण्यासाठी गेल्या काही वर्षात मागणी येत होती, हि मागणी महाराष्ट्र सरकारने पूर्ण करून या निम्नवर्गीय आणि मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांच्या सहकारी पतसंस्थेमधील ठेवींना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना 2022 राज्यात सुरु केली आहे.

                Mahajobs Portal

पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी जमा संरक्षण योजना 2022 वैशिष्ट्ये (Features)

पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण मिळण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून येत होती त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या पतसंस्थेमधील ठेवींना संरक्षण देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली, पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना हि महाराष्ट्रातील मध्यम वर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांच्या ठेवींचे संरक्षण करेल, ग्रामीण भागातील पतसंस्थांमध्ये एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी जमा संरक्षण योजना 2022 सुरु केली आहे.

सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधी बरोबर बैठक घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना सुरु करण्याची घोषणा सहकारमंत्र्यांनी केली आहे, या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार विविध पतसंस्थांमधील निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय ठेवीदारांच्या मुदत ठेवींचे संरक्षण करेल, हि पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना व्यापारी बँकांच्या ठेवीदारांना मिळत असलेल्या संरक्षणाप्रमाणे संरक्षण पतसंस्थेमधील ठेवीदारांच्या ठेवींना देईल.

पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना [ Highlights ]

योजनेचे महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम 2022
व्दारा सुरुवात महाराष्ट्र सरकार
लाभार्थी राज्याचे नागरिक
उद्देश्य योजना हि योजना महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांमध्ये असलेल्या मध्यमवर्गीय नागरिकांच्या एक लाख पर्यांच्या मुदत ठेवींचे संरक्षण करते
योजनेची सुरुवात  25 सप्टेंबर 2018
श्रेणी राज्य शासन योजना


पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना ठळक वैशिष्ट्ये

पतसंस्थांची दीर्घकालीन मागणी असल्याने 25 सप्टेंबर 2018 रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना सुरु केली होती, या योजनेंतर्गत एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्यात येईल, हि योजना नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या योजनेचे अनुसरण करते, या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना हि योजना महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांमध्ये असलेल्या मध्यमवर्गीय नागरिकांच्या एक लाख पर्यांच्या मुदत ठेवींचे संरक्षण करते
  • महाराष्ट्र राज्यात एकूण 8,421 पतसंस्था आहे आणि त्यामधील एकूण ठेवी 40,000/- कोटी रुपये आहे, हि योजना या ठेवींना अतिरिक्त संरक्षण प्रदान करते
  • या योजनेव्दारे ग्रामीण भागातील पतसंस्थांमध्ये असणाऱ्या मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय यांच्या मुदत ठेवींचे संरक्षण केले जाईल
  • या योजनेंतर्गत जर कोणत्याही सहकारी पतसंस्थेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला किंवा स्थगिती कालवधीत गेला तरीही ठेवीदारांना त्यांचे एक लाख पर्यंतची ठेव परत मिळेल
  • माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 सप्टेंबर 2018 रोजी सुरु केलेली हि संरक्षण योजनेची पतसंस्था दीर्घकाळापासून मागणी करत होत्या, या प्रकारचे 5 लाख रुपया पर्यंतचे संरक्षण बँकांमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे
  • या प्रकारचे संरक्षण रिसर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनव्दारे नागरी सहकारी बँकांना दिले जाते, राज्य सरकारची हि योजना ग्रामीण (अकृषी) शहरी, महिला आणि पगारदार पतसंस्थांना लागू राहील
राज्याच्या अर्थकारणामध्ये तसेच ग्रामीण व शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेत या पतसंस्थांचा मोठा वाटा असतो या पतसंस्था सूक्ष्म वित्त संस्था महणून काम करत असतात आणि लहान दुकानदार, मजूर आणि छोटे व्यावसायी जे कमी उत्पन्न गटातील असतात त्यांना सेवा देण्याचे काम करतात, महाराष्ट्र राज्य सरकार पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी जमा संरक्षण योजनेच्या अंतर्गत सहभागी होण्यासाठी क्रेडीट सोसायट्यांकडून अर्ज आमंत्रित करत आहे, वाचक मित्रहो, या लेखामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आपल्याला या योजने सबंधित काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून विचारू शकता, हि पोस्ट आपल्याला आवडली असल्यास आम्हाला अवश्य कळवा.

           महाराष्ट्र शिव भोजन योजना

Maharashtra Pandit Deendayal Upadhyay Credit Society Deposit Protection Scheme 2022 FAQ

Q. पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना काय आहे ?

पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना अंतर्गत मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यम नागरिकांच्या सहकारी पतसंस्थेमधील एक लाख रुपये पर्यंतच्या मुदत ठेवींना संरक्षण देते.

Q. पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना कुठे सुरु झाली आहे ?

भारतीय रिसर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विमा आणि क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनव्दारे दिले जाणारे संरक्षण नागरी सहकारी बँकांप्रमाणेच सहकारी पतसंस्थांना सुद्धा मिळणार आहे, महाराष्ट्र शासनाने हि योजना राज्यातील  ग्रामीण तसेच शहरीभागतील पतसंस्थेमधील नागरिकांच्या एक लाख रुपये पर्यंतच्या मुदत ठेवींना संरक्षण देण्यासाठी सुरु केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने