Mahajobs Portal 2023 Online Registration at mahajobs.maharashtra.gov.in | महाजॉब्स पोर्टल ऑनलाइन रजिस्ट्रेशन, ऑनलाइन अर्ज | महाराष्ट्र सरकारी योजना | सरकारी नोंदणी पोर्टल 2023 | महा जॉब्स पोर्टल 2023 मराठी | Job Seekers Registration at mahajobs.maharashtra.gov.in | महा जॉब्स पोर्टल लॉगिन
भारत देश हा एक विकासशील देश आहे त्यामुळे देशामध्ये विविध प्रकारच्या आणि विविध क्षेत्रांमधील रोजगार मोठयाप्रमाणात पाहायला मिळतो तरीही निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या असंख्य संधी असून सुद्धा देशामध्ये मोठया प्रमाणात असंख्य तरुण बेरोजगार आहे हि बेरोजगारी आपल्याला विविध वयोगटातील नागरिकांमध्ये दिसून येते, तसेच महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक उद्योग असलेले राज्य आहे, महाराष्ट्र राज्याचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात पंधरा टक्क्याचा वाटा आहे असे असून सुद्धा राज्यात ग्रामीण तसेच शहरी भागात सुद्धा बेरोजगारी दिसून येते तसेच दुसरीकेडे असे दिसुन येते कि उद्योजकांना नेहमी कुशल कामगारांची कमतरता भासत असते, ग्रामीण तसेच शहरी भागांमधील कुशल किंवा अर्धकुशल कामगारांना त्यांच्या कौशल्या प्रमाणे रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहे या बद्दल माहिती नसते तसेच व्यावसायिकांना सुद्धा या समस्यांना समोर जावे लागते, त्यांना सुद्धा त्यांच्या व्यवसायासाठी कौशल्यपूर्ण कामगार मिळत नाही.
या सर्व समस्यांचा विचार करून आणि राज्यातील स्थानिक नागरिकांना रोजगार सहज उपलब्ध व्हावा, नागरिकांना रोजगार सुलभतेने शोधता यावा तसेच उद्योजकांना त्यांचा व्यवसायासाठी सुलभतेने कौशल्यपूर्ण कामगार उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाने या महाजॉब्स पोर्टल 2022 ची सुरुवात केली आहे, वाचक मित्रहो, या लेखामध्ये आपण शासनाच्या या महा जॉब्स पोर्टल विषयी संपूर्ण माहिती जसेकी या पोर्टलची अमलबजावणी, या पोर्टलमध्ये ऑनलाइन अर्ज कसा करावा, ऑनलाइन नोंदणी, रोजगारासाठी उपलब्ध असलेली क्षेत्रे इत्यादी माहिती पाहणार आहोत.
{tocify} $title={Table of Contents}
महा जॉब्स पोर्टल 2023 संपूर्ण माहिती मराठी
महाराष्ट्र शासनाने महा जॉब्स पोर्टल हे रोजगार शोधणारे कामगार, नागरिक तसेच रोजगार उपलब्ध करणारे उद्योजक यांच्या मधील अंतर कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे नोकरी शोधणारे नागरिक यांना त्यांच्या कौशाल्याप्रमाणे तसेच त्यांच्या सुविधेप्रमाणे रोजगार शोधता यावा आणि त्याचप्रमाणे उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी या ऑनलाइन पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे, महाजॉब्स हे ऑनलाइन पोर्टल असल्यामुळे रोजगार शोधणारे कामगार नोकरी शोधण्यासाठी पोर्टलवर सुलभतेने नोंदणी करू शकतात आणि तसेच उद्योजक त्यांच्या उद्योगासाठी कौशल्यपूर्ण कामगार शोधण्यासाठी या पोर्टलवर नोंदणी करू शकतात. महाजॉब्स पोर्टल हा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग आणि कौशल्य विकास उद्योजकता विभाग यांचा संयुक्तपणे उपक्रम आहे, शासनाच्या या महाजॉब्स पोर्टलचा मुख्य उद्देश आहे निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्य प्रकारात मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील अंतर कमी करणे आणि राज्यातील उद्योगांना अखंडपणे कार्य करणासाठी सक्षम बनविणे.
![]() |
महाजॉब्स पोर्टल 2022 |
शासनाने महाजॉब्स पोर्टल अंतर्गत 950 ट्रेड्स आणि 17 निरनिराळ्या क्षेत्रांचा समवेश केला आहे ज्यामध्ये इंजिनिअरींग, लॉंजिस्टिक, टेक्स्टाईल, आणि फार्मास्युटिकल इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो या विविध क्षेत्रांमधील रोजगारांसाठी रोजगार शोधणारे कुशल, अर्धकुशल किंवा अकुशल कर्मचारी या पोर्टलव्दारे अर्ज आकृ शकतात, महाजॉब्स पोर्टल रोजगार शोधणाऱ्या नागरिकांना रोजगाराची हमी देत नाही परंतु हे पोर्टल रोजगार शोधणाऱ्यांना सुविधा निर्माण करून देते जेणेकरून त्यांना स्थानिक पातळीवर त्यांच्या कौशल्या प्रमाणे नोकरी शोधता यावी, त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये कौशल्य असणारे उमेदवार त्यांच्या स्थानिक व जवळच्या क्षेत्रांसाठी किंवा त्यांच्या कौशल्याप्रमाणे, विशिष्ट क्षेत्रासाठी अर्ज करू शकतात.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2022
महाराष्ट्र महाजॉब्स पोर्टल 2023 वैशिष्ट्ये [Features]
महाराष्ट्र राज्यातील विविध
जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील आणि शहरी भागामधील तरुणांना त्यांच्या
कौशल्याप्रमाणे सर्वोत्तम रोजगार मिळविण्यासाठी तसेच व्यावसायिक जीवनात यशाचे
शिखर गाठण्यासाठी महाराष्ट्र सरकार या
पोर्टलव्दारे संधी उपलब्ध करून देत आहे, त्यामुळे तरुणांना उद्योग क्षेत्राचा एक
महत्वपूर्ण भाग होता येईल आणि त्यांच्या कौशल्य क्षेत्रामध्ये प्रगती करता येईल.
कोविड -19 या विषाणूचा आजार
हा संपूर्ण जगभरात करोना महामारीच्या रुपात पसरला होता, या करोना महामारीमुळे
संपूर्ण जगभरात आर्थिक संकट निर्माण झाले होते, अशीच परिस्थिती भारतात सुद्धा
निर्माण झाली होती या कोविड -19 आजाराच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक
परिस्थितीमध्ये राज्यात अनेक नागरिक बेरोजगार झालेले आहे, तर अनेक नागरिकांच्या
वेतनामध्ये कपात झाली आहे, त्याच प्रमाणे बहुतांश लोकांच्या नोकऱ्या या आर्थिक
संकटात गेल्या, तसेच बाहेरील कामगार टाळेबंदीमुळे रोजगाराच्या सबंधित राज्याच्या
बाहेर गेलेले आहेत त्यामुळे उद्योगांमध्ये कामगारांची कमतरता निर्माण झाली परंतु
यामुळे राज्यातील तरुण नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे,
त्याचप्रमाणे महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून उद्योजकांना कुशल आणि अकुशल मनुष्यबळ
उपलब्ध होणार आहे.
त्याचबरोबर राज्यातील
उद्योग आणि व्यवसाय पुन्हा जलदगतीने सुरु होऊन प्रगतीपथावर अग्रेसर होतील.
MahaJobs Portal Highlights
योजनेचे नाव | महाजॉब्स पोर्टल 2023 महाराष्ट्र |
---|---|
व्द्दरा सुरु | महाराष्ट्र शासन |
सुरु करण्याची तारीख | 6 जुलै 2020 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्याचे रोजगार शोधणारे आणि उद्योजक |
आधिकारिक वेबसाईट | https://mahajobs.maharashtra.gov.in |
उद्देश्य | कुशल मनुष्यबळाची कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करण्यासाठी |
नोंदणी करण्याची पद्धत | ऑनलाइन |
महाराष्ट्र शिवभोजन योजना 2022
महाराष्ट्र महाजॉब्स पोर्टल 2023 कार्यपद्धती
कोविड -19 महामारी हे
जगासाठी आरोग्य संकटच नव्हते तर जगासाठी फारमोठे आर्थिक संकट सुद्धा होते, परंतु
या करोना महामारीला रोखण्यामध्ये शासनाला यश मिळाले आहे, त्याचप्रमाणे भारताच्या
सकल उत्पन्नात पंधरा टक्के वाटा महाराष्ट्र राज्याचा आहे आणि महाराष्ट्र
राज्यामध्ये सर्वाधिक उद्योग आहेत हे उद्योग अखंडपणे सुरु ठेवणे त्याचबरोबर उद्योगप्रक्रिया
सुलभ करण्याची गरज आहे, तसेच या करोना मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला उत्तर
देण्यासाठी राज्यातील उद्योगांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे, कुशल मनुष्यबळाची
आवश्यकता विचारात घेऊन उद्योगांच्या दृष्टीकोनातून राज्याचे आर्थिक पुनरुज्जीवन
करणे हा महाराष्ट्र महाजॉब्स चा उद्देश आहे.
महाराष्ट्र सरकारने
राज्यातील टाळेबंदी समाप्त केल्यानंतर राज्यातील 65000 आधुनिक उद्योग पुन्हा सुरु
करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांनी 2020 मध्ये
मानव संसाधन सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते, या झालेल्या मानव संसाधन
सर्वेक्षणा अंतर्गत राज्यातील 65000 उद्योगांपैकी सुमारे 3300 उद्योगांनी या मध्ये
प्रतिक्रिया दिली आहे. या सर्वेक्षणामध्ये या उद्योगांनी सुमारे 50000
कर्मचाऱ्यांची आवश्यकता दाखवली आहे, या कामगारांमध्ये 70 टक्के कुशल कामगार आणि अर्ध
कुशल कामगार आहेत व 30 टक्के अकुशल कामगार आहेत. तसेच या महाजॉब्स पोर्टवर MIDC
औद्योगिक वसाहती मधील उद्योगांबरोबर MIDC बाहेरील उद्योग सुद्धा कर्मचाऱ्यांच्या
भरतीसाठी नोंदणी करू शकतात. यामुळे रोजगार शोधणारे कामगार आणि रोजगार देणारे
उद्योजक यांच्या मधील अंतर कमी होण्यास मदत होईल.
महाजॉब्स पोर्टल 2023 महाराष्ट्र उद्दिष्टे
महाराष्ट्र राज्याच्या तरुण
बेरोजगार नागरिकांना त्यांच्या विविध कौशल्याच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि
उद्योगांमधील कामगारांची कमतरता या समस्येवर मात करण्यासाठी आणि त्याचबरोबर
राज्यातील उद्योगांना आपले कार्य सुरळीतपणे करता यावे या उद्देशाने महाजॉब्स
पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या महाजॉब्स पोर्टलची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या उद्योग मंत्रालयाने 16,000/- कोटी रुपये गुंतवणुकीच्या उद्देशाने 12 सामंजस्य करार केले आहेत, तसेच राज्यातील उद्योग 80 टक्के रोजगार स्थानिक नागरिकांना देतील अशी महाराष्ट्र सरकारची अपेक्षा आहे, त्याचप्रमाणे नवीन उद्योजकांना महाराष्ट्र राज्यामध्ये गुंतवणूक करणे सहज शक्य व्हावे आणि नवीन औद्योगिक युनिट्स उभारण्यासाठी आवश्यक ते सहाय्य महाराष्ट्र शासन करणार आहे.
- महाराष्ट्र राज्यातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळाची कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करण्यासाठी हे वेबपोर्टल मदत करेल.
- महाराष्ट्र राज्यातील उद्योगांना सात्यत्याने कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी
- विविध प्रकारच्या कौशल्य प्रकारात मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील अंतर कमी करण्याच काम हि वेबसाईट करेल
- हे महाजॉब्स वेबपोर्टल रोजगार शोधणारे आणि रोजगार देणारे उद्योजक यांच्यामधील दुवा म्हणून काम करेल
- हि वेबसाईट उद्योजकांना कोणत्याही अडचणी शिवाय कामगारांना भरती करण्यास मदत करेल आणि त्याचप्रमाणे नोकरी शोधणाऱ्यांनाही रोजगार शोधण्यात मदत करेल
- महाराष्ट्रातील ग्रामीण किंवा शहरी भागातील तरुण नागरिकांना त्यांना अवगत असलेल्या कौशल्याच्या आधारावर सर्वोत्तम रोजगार उपलब्ध करून देणे आणि यशस्वी करिअर निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच महत्वपूर्ण काम महाजॉब्स पोर्टल करत आहे.
महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र
महाजॉब्स पोर्टलवरील रोजगार क्षेत्रांची लिस्ट
महाराष्ट्र शासनाच्या
महाजॉब्स पोर्टलवर रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध प्रकारच्या 17 क्षेत्रांची
निवड करण्यात आली आहे त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत
- ऑटोमोबाईल
- इंजिनिअरींग
- प्रोडक्शन
- लॉंजिस्टिक
- इलेक्ट्रॉनिक्स अंड हार्डवेअर
- एरोस्पेस अंड एव्हिएशन
- फूड प्रोसेसिंग
- परिधान
- सामान्य
- इंस्ट्रूमेंटेशन, ऑटोमेशन, सर्विलन्स एंड संप्रेषण
- लोखंड पोलाद
- लेदर
- IT-ITES
- जिव विज्ञान
- पेंट एंड कोटिंग्स
- पॉवर
- कापड आणि हातमाग
महाजॉब्स पोर्टल महाराष्ट्र पोर्टलचे लाभ (Benefits)
- महाराष्ट्र महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून रोजगार शोधणाऱ्या कामगारांना आणि रोजगार देणाऱ्या उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे त्याचप्रमाणे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून राज्याचे आर्थिक पुनरुज्जीवन करणे हे महाराष्ट्र महाजॉब्सचे लक्ष आहे. महाजॉब्स पोर्टलचे अनेक लाभ आहेत.
- महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाने 12 सामंजस्य करार केले आहे ज्यामध्ये 16,000/- कोटी रुपयाची गुंतवणूक होण्याची महाराष्ट्र सरकारला अपेक्षा आहे
- महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांनी 6 जुलै 2020 रोजी अधिकृतपणे महराष्ट्रातील बेरोजगार उमेदवारांसाठी महाजॉब्स पोर्टल सुरु केले
- महाजॉब्स पोर्टलवर उद्योजक आणि रोजगार शोधणारे दोघेही स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतात, माहिती नुसार महाजॉब्स वेबसाईटच्या अधिकृत उद्घाटना दिवशीच 13,300 रोजगार शोधणे आणि 143 उद्योजक यांनी नोंदणी केली आहे
- शासनाने या पोर्टल मध्ये 17 विविध क्षेत्र समाविष्ट केले आहे ज्यामध्ये इंजिनिअरींग, लॉंजिस्टिक, टेक्स्टाईल, फार्मास्युटिकल, लोखंड व पोलाद इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो
- महाजॉब्स वेबसाईट म्हणजे रोजगार शोधणारे नागरिक आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यांना जोडणारे माध्यम आहे
- आंध्रप्रदेश प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्यातील स्थानिक नागरिकांना 80 टक्के नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे विधेयक राज्य विधानसभेत मांडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे
- महाजॉब्स पोर्टल म्हणजे रोजगार शोधणाऱ्या तरुणांना त्यांच्या योग्यतेनुसार आणि कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम आहे
महाजॉब्स पोर्टल 2023 अर्ज करण्यासाठी माहिती आणि आवश्यक कागदपत्र
- महाजॉब्स पोर्टलवर रोजगार शोधण्यासाठी सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी लागणारी माहिती आणि कागदपत्र खालीलप्रमाणे आहेत
- पूर्ण नाव
- OTP साठी मोबाइल नंबर
- ई–मेल आयडी
- पत्ता
- बायोडेटा
- शैक्षणिक पात्रता आणि तपशील
- फोटो आणि आवश्यक कागदपत्र
- महाजॉब्स पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्र खालीलप्रमाणे राहील
- महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा अधिकृत दाखला
- तुमच्याकडे असलेले शैक्षणिक प्रमाणपत्रे ( दहावीचे मार्कशीट, उत्तीर्ण प्रमाणपत्र )
- बारावीचे मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- पदव्युत्तर मार्कशीट
- इतर कोणतीही शैक्षणिक पात्रता असल्यास मार्कशीट किंवा प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड
- कौशल्य प्रमाणपत्र
mahajobs.maharashtra.gov.in पोर्टल 2023 अर्ज आणि नोंदणी
महाराष्ट्र सरकारने या
पोर्टलवर 17 विविध क्षेत्रांची निवड केली आहे हे पोर्टल मराठी आणि इंग्रजी दोन्ही
भाषेत उपलब्ध आहे त्यामुळे नोकरी शोधणारे तरुण आपल्या कौशल्यानुसार या
क्षेत्रांमधून कोणत्याही विशिष्ट
क्षेत्रामध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या क्षेत्रामध्ये
अर्ज करू शकतात, या पोर्टलवर अर्ज आणि नोंदणी करण्यासाठी खालीलप्रमाणे सुलभ
प्रक्रिया आहे
- सर्व प्रथम तुम्हाला शासनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल या नंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल, या होम पेजवर तुम्हाला ‘’Job Finder Registration’’ हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा, तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल
- आता तुमच्यासमोर ऑनलाइन नोंदणी फॉर्म दिसेल, यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा
- तुमचे पूर्ण नाव
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर :- मोबाइल नंबर टाकून गेट OTP वर क्लिक करा, आता मिळालेला OTP टाकून Verify OTP
- ई-मेल आयडी :- ई-मेल आयडी पर्यायी आहे आणि ई–मेल आयडी असेल तर OTP व्दारे Verify करा
- आता पासवर्ड सेट करा हा महत्वाचा भाग आहे, पासवर्ड लक्षात राहण्यासाठी नोट करून ठेवा
- यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड भरायचा आहे तो बॉक्स मध्ये प्रविष्ट करा, आता पूर्ण फॉर्म भरल्यावर एकदा चेक करा आणि नोंदणी फॉर्म सबमिट करा
- यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी पोर्टलच्या होम पेजवर जावे लागेल, होम पेजवर तुम्हाला ‘’लॉगीन’’ पर्याय दिसेल, तुमचे क्रेडेन्शियल जसे कि युजरआयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा, आणि यानंतर फॉर्म मध्ये विचारलेली महत्वाची माहिती अचूकपणे भरावी
- पूर्ण नाव
- वर्तमान पत्ता [पत्रव्यवहाराचा पत्ता]
- कायमचा पत्ता
- शैक्षणिक तपशील
- कामाचा अनुभव तपशील कौशल्य तपशील
- माहित असेलेली भाषा
- स्थलांतर करण्याची इच्छा
महाजॉब्स पोर्टल नियोक्ता नोंदणी
महाजॉब्स पोर्टलवर शासनाने
हि सुविधा उपलब्ध करून दिली आहे ज्याप्रमाणे रोजगार शोधणारे पोर्टलवर नोदणी करू
शकतात त्याच प्रमाणे उद्योजक या पोर्टलवर नोंदणी करून स्वतःच्या व्यवसायासाठी कुशल
मनुष्यबळ शोधण्यासाठी या पोर्टलवर नोंदणी करू शकतात, यामध्ये नियोक्ता नोंदणी कशी
करावी ते खालीलप्रमाणे आहे
- नियोक्ता नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासनच्या आधिकारिक वेबसाईट वर जावे लागेल, तुम्हाला होम पेजवर ‘’Employer Registration’’ किंवा मराठीत उद्योजक नोंदणी दिसेल त्यावर क्लिक करा, तुमच्यासमोर नोंदणीसाठी अर्ज दिसेल
- यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती प्रविष्ट करा
- तुमच्या कंपनीचे नाव
- कंपनी क्षेत्र
- संपर्क व्यक्तीचे नाव
- मोबाइल नंबर – OTP व्दारा Verify करा
- ऑफिसचा ई–मेल आयडी – OTP व्दारा Verify करा
- फोन क्रमांक
- आता पासवर्ड सेट करा आणि नंतर लॉगिन साठी नोट करून ठेवा
- यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण पडताळणी करा आणि बॉक्स मध्ये कॅप्चाकोड असेल तो प्रविष्ट करा, आणि सबमिट बटनावर क्लिक करा या प्रकारे तुमची पोर्टवर नोंदणी होईल, या नंतर तुम्हाला होम पेजवर परत जाऊन तुमचे सर्व क्रेडेन्शियल वापरून लॉगिन करा
महाजॉब्स पोर्टल नोकरी शोधक लॉगिन
- महाराष्ट्र महाजॉब्स पोर्टलवर तुम्हाला रोजगार शोधण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करा
- प्रथम आपल्याला अधिकृतवेबसाईट वर भेट द्यावी लागेल, यानंतर तुमची सर्व क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करावे लागेल.
- त्यानंतर तुम्ही ‘’Search Job’’ या पर्यायावर क्लिक करा, तुम्ही योग्य परिणाम मिळण्यासाठी फिल्टरचा उपयोग करू शकता, यामध्ये तुम्ही कौशल्य क्षेत्र, कौशल्य श्रेणी, शिक्षण, इत्यादी निवडू शकतो, View More या पर्यायावर क्लिक करून तुम्ही कंपनीचे नाव पाहू शकता.
- यानंतर फिल्टर लागू करा आणि क्लिक करा, तुम्ही जॉब ट्रकिंग आयडी वापरून तुमचे अप्लिकेशन ट्रक करू शकता.
महाजॉब्स पोर्टल 2023 लॉगिन प्रक्रिया
महाराष्ट्र महाजॉब्स पोर्टल
2023 वर तुमची नोंदणी झाल्यावर या पोर्टलवर तुम्ही कधीही तुमच्या आवश्यकतेनुसार
पोर्टलवर लॉगिन करू शकता, पोर्टलवर तुमचे खाते सक्रीय असेल या पोर्टलवर उद्योजक
आणि रोजगार शोधणाऱ्यांनी लॉगिन करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल
जॉब फाइंडर लॉगिन :-
- महाजॉब पोर्टलच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, अधिकृत पोर्टल mahajobs.maharashtra.gov.in
- यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल, होम पेजवर ‘’जॉब फाइंडर लॉगिन’’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल, आता तुमच्यासमोर एक पॉप-अप विंडो उघडेल
- यानंतर अधिकृत मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडी प्रविष्ट करावा लागेल, त्यानंतर नोंदणी वेळी सेट केलेला पासवर्ड भरून हि प्रक्रिया पूर्ण करा
- यानंतर कॅप्चा प्रविष्ट करा आणि लॉगिनवर क्लिक करावे लागेल, या पोर्टलवर ‘’Forgot Password’’ हा पर्याय सुद्धा आहे जर तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर या पर्यायावर क्लिक करा, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल व्दारे किंवा ई-मेल व्दारे नवीन पासवर्ड सेट करता येईल
- याप्रमाणे लॉगिन करून तुम्ही नोकरी शोधण्यासाठी या पोर्टवर लॉगिन करू शकतात
- तसेच ज्यांनी रोजगार शोधण्यासाठी या पोर्टलवर नोंदणी केलेली नाही ते नवीन नोंदणी हा पर्याय वापरून या प्रक्रीये प्रमाणे नवीन नोंदणी करू शकतात
उद्योजक लॉगिन
- महाराष्ट्र शासनच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल या होम पेजवर तुम्हाला उद्योजक लॉगिन पर्याय दिसेल
- तुम्हाला उद्योजक लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल, यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडी प्रविष्ट करावा लागेल, यानंतर नोंदणी वेळी तयार केलेला पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल
- यानंतर बॉक्स मध्ये असलेला कॅप्चा कोड भरून लॉगिन वर क्लिक करा
- अशा प्रकारे उद्योजक त्यांच्या खात्यामध्ये लॉगिन करू शकतात
महाजॉब्स पोर्टल डिपार्टमेंट लॉगिन प्रक्रिया
- महाजॉब्स पोर्टलवर वेबसाईटच्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी लॉगिन विभाग आहे त्यामुळे पोर्टलच्या कर्मचाऱ्यांसाठी विभाग लॉगिन खालीलप्रमाणे आहे
- आपल्याला सर्वप्रथम mahajobs.maharashtra.gov.in या शासनाच्या अधिकृत महाजॉब्स पोर्टलवर जावे लागेल,
- यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल, या होम पेजवर ‘’Department Login’’ हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा युजर आयडी, पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल आणि त्यानंतर कॅप्चा कोड भरून तुम्हाला लॉगिन वर क्लिक करावे लागेल
- या प्रकारे तुम्ही महाजॉब्स पोर्टलच्या विभाग लॉगिन मध्ये लॉगिन करू शकता.
महाजॉब्स पोर्टल अर्ज स्थिती तपासणे
- महाराष्ट्र राज्यातील ज्या तरुणांनी महाजॉब्स वेबसाईट वर रोजगारासाठी ऑनलाइन अर्ज केलेला आहे ते पुढीलप्रमाणे प्रक्रिया अनुसरून आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहू शकतात
- सर्वप्रथम आपल्याला महाजॉब्स पोर्टलच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल, यानंतर लॉगिन विभागात गेल्यावर तुम्हाला आवश्यक असलेला सर्व तपशील भरा याप्रमाणे लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा
- आता तुमच्यासमोर तुमचे खाते ओपन होईल आणि त्यानंतर तुम्ही निवडलेल्या नोकरीच्या विभागावर क्लिक करून खालीलप्रमाणे तपशील प्रविष्ट करा
- ट्रॅकिंग आयडी
- उद्योग
- तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती आणि सबंधित माहिती दिसेल
महाराष्ट्र महाजॉब्स पोर्टल अँड्रॉइड अॅप्लिकेशन डाऊनलोड
महाराष्ट्र शासनाने नोकरी
शोधणाऱ्या नागरिकांसाठी तसेच उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ शोधणारे उद्योजक यांना
सुलभतेने त्यांचे प्रयोजन पूर्ण करता यावे यासाठी महा जॉब्स पोर्टलचे एक अँड्रॉइड
अॅप्लिकेशन तयार केले आहे. आपल्याला जर हे महाजॉब्स पोर्टलचे अॅप्लिकेशन डाऊनलोड
कार्याचे असेल तर पुढील प्रक्रियेच अनुसरण करा
- तुम्हाला सर्वप्रथम महाजॉब्स पोर्टलच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल, आता तुमच्यासमोर ओपन झालेल्या होम पेजवर तुम्हाला अँड्रॉइड अॅप्लिकेशनची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा
- यानंतर तुम्हाला पुनर्निर्देशीत करून गूगल प्ले स्टोरच्या पेजवर पाठविल्या जाईल, यानंतर तुम्हाला Install ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा, क्लिक करताच अॅप्लिकेशन डाऊनलोड होण्यास सुरुवात होईल
- यानंतर तुम्ही महाजॉब्सचे अॅप्लिकेशन ओपन करून तुमचे क्रेडेन्शियल्स वापरून आपल्या खात्यामध्ये लॉगिन करू शकता.
- महाजॉब्सच्या या अँड्रॉइड अॅप्लिकेशन मुळे आपण कधीही आवश्यकतेनुसार लॉगिन करू शकता आणि त्याचबरोबर अर्जाची स्थिती देखील पाहू शकता
महाराष्ट्र महा जॉब्स पोर्टल संपर्क तपशील
- महा जॉब्स पोर्टल वर तुम्ही संपर्क तपशील पाहू शकता
- तुम्हाला प्रथम महाजॉब्स पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.
- या होम पेजवर तुम्हाला संपर्क पर्याय शोधून त्यावर क्लिक करणे आवश्यक आहे, आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवर तुम्हाला संपर्का सबंधित सर्व तपशील पाहायला मिळेल.
महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या अथक प्रयत्नामुळे करोना विषाणूचा गंभीर आजार जास्तीत जास्त नियंत्रणात आलेला आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात जलदगतीने उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत आहे तसेच परदेशी गुंतवणूक आणि राज्यामधील उद्योगांचे विस्तारीकरणासाठी मोठया प्रमाणात मनुष्यबळाची निकड भासणार आहे आणि हि मनुष्यबळाची निकड सहजतेने पुरविण्यासाठी महाजॉब्स हे प्रभावी माध्यम ठरणार आहे. वाचक मित्रहो या लेखामध्ये महाजॉब्स पोर्टल विषयी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरीही आपल्याला काही आणखी माहिती जाणून घायची असेल किंवा काही प्रश्न असतील तर आपण खालीलप्रमाणे संपर्क साधू शकता.
संपर्क हेल्प लाईन :- महाराष्ट्र महाजॉब्स पोर्टल बद्दल आणखी जाणून घायचे असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास या हेल्प लाईन क्रमांकावर फोन करू शकता किंवा ई-मेल सुद्धा करू शकता
- फोन क्रमांक :- 022-61316405
- ई-मेल :- [email protected]
महाराष्ट्र महाजॉब्स पोर्टल FAQ
Q. महाजॉब्सच्या मोबाइल
अप्लिकेशनव्दारे आपण नोंदणी करू शकतो काय ?
याचे उत्तर आहे होय, आपण
महाजॉब्स पोर्टलच्या मोबाइल अप्लिकेशन वरून नोकरीसाठी नोंदणी करू शकतो.
Q. महाजॉब्स पोर्टलव्दारा
नोकरी मिळण्यासाठी किती वेळ लागतो ?
महाराष्ट्र शासनाचे महाजॉब्स
पोर्टल आपल्याला रोजगाराची हमी देत नाही परंतु रोजगार देणारे उद्योजक आणि रोजगार
शोधणारे नागरिक यांच्यामधील अंतर कमी करण्यास मदत करते.
Q. महाजॉब्स पोर्टलची अधिकृत
वेबसाईट कोणती आहे ?
महाजॉब्स पोर्टलची आधिकारिक
वेबसाईट mahajobs.maharashtra.gov.in हि आहे
Q. महाजॉब्स पोर्टलवर कोण
नोंदणी करू शकत ?
महाराष्ट्र महाजॉब्स
पोर्टलवर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी अर्ज करू शकतात आणि शासनाने राज्यातील
स्थानिक नागरीकांना उद्योगांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणत रोजगार मिळावा म्हणून या
वेबसाईटची सुरुवात केली आहे
Q. महाजॉब्स पोर्टलवर कोणत्या
कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळेल ?
महाराष्ट्र शासनाने या
पोर्टलच्या माध्यमाने 17 विविध क्षेत्रे जोडलेली आहे ज्यामध्ये इंजिनिअरींग,
लॉंजिस्टिक, केमिकल इत्यादी क्षेत्रांसाठी स्थानिक नागरिक अर्ज करू शकतात