Mahajyoti Free Tablet Yojana 2023: 10 वी पास विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत टॅब आणि 6 GB/Day इंटरनेट डाटा | फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 मराठी माहिती | फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन रजिस्ट्रेशन | Free Tablet Yojana Maharashtra | महाज्योती टॅबलेट योजना 2023 | फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज, लाभ, पात्रता संपूर्ण माहिती | Mahajyoti Portal | Mahajyoti Portal Registration 2023 | महाज्योती पूर्व प्रशिक्षण योजना 2025
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय आणि भटक्या जाती तसेच विमुक्त जमाती अशा विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET - 2025 या साठी पूर्व प्रशिक्षण या योजना या योजनेच्या अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे, या योजनेमध्ये महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येते, समाजात अनेक विद्यार्थ्यांना दहावी नंतर उच्च शिक्षण घायचे असते, परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत नाही, परंतू आता राज्य शासनाने यामध्ये विद्यार्थ्यांना मदत करण्याचे ठरविले आहे, महाराष्ट्र शासनाने महाज्योतीच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे, यासाठी शासनाकडून या विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या माध्यमातून मोफत टॅबलेट आणि त्याबरोबर 6 GB इंटरनेट डाटा प्रतिदिवस पुरविण्यात येणार आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध योजना राबवित आहे. यापैकी एक योजना महाज्योती मोफत टॅबलेट योजना आहे जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते. महाराष्ट्र शासनाने महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) च्या सहकार्याने इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्याची योजना सुरू केली आहे.
MH-CET/JEE/NEET 2025 च्या पूर्व तयारीसाठी इतर मागासवर्गीय आणि भटक्या जाती तसेच विमुक्त जमाती अशा विशेष मागास प्रवर्गातील या श्रेणींमध्ये नॉन-क्रिमिलेअर इन्कम ग्रुपमधील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग, मेडिकलची तयारी करायची असते, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे महागडे कोचिंग क्लासेस परवडत नसल्यामुळे महाज्योती संस्थेने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. तुम्हाला मोफत टॅबलेट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. आम्ही या लेखात अर्ज करण्यासाठी पद्धत खाली सांगितली आहे. या योजनेचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांनी मिळविला पाहिजे, यासाठी तुम्हाला हा लेख जरूर वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
{tocify} $title={Table of Contents}
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर ही राज्य सरकारची स्वायत्त संस्था आहे जी OBC/VJNT/SBC प्रवर्गातील MHT-CET/JEE/NEET-2025 परीक्षेच्या विनामूल्य ऑनलाइन तयारीसाठी, राज्यातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेच्या संबंधित वितरणासाठी, संबंधितांनी शेवटची तारीख 31 मार्च 2023 पर्यंत www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील सूचना फलकावर उपलब्ध असलेल्या "MHT-CET/JEE/NEET-2025 Training" वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज आणि तपशील वेबसाइटवर उपलब्ध आहेत (महाज्योती मोफत टॅब्लेट योजना महाराष्ट्र 2023).
![]() |
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र |
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर अंतर्गत दरवर्षी दहावीच्या नंतर आर्थिक मागासलेल्या तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली जाते. महाज्योती योजनेअंतर्गत, विज्ञान शाखेच्या अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना MHT-CET/JEE/NEET-2025 साठी मोफत कोचिंगसाठी मोफत टॅब्लेटचे वाटप केले जाते. ज्याचा वापर करून आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांना मिळालेल्या या सुविधांचा उपयोग करून त्यांचे भविष्य सुधारू शकतात. आणि पुढील जीवनात स्थेर्य मिळवू शकतात.
सीबीएससी सिंगल गर्ल चाईल्ड स्कॉलरशिप योजना
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 Highlights
योजना | फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र |
---|---|
व्दारा सुरु | महाराष्ट्र शासन |
अधिकृत वेबसाईट | https://mahajyoti.org.in/en/home/ |
महाज्योती स्थापना | 8/8/2019 |
लाभार्थी | इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT), आणि विशेष मागास वर्ग (SBC) तसेच शासन किंवा महाज्योतीने निश्चित केलेल्या वंचित व उपेक्षित जनसमुह |
विभाग | इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग, सरकारची स्वायत्त संस्था. महाराष्ट्र) |
उद्देश्य | इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मदत प्रदान करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 31/03/2023 |
लाभ | शासनाकडून फ्री टॅबलेट आणि 6 GB/Day इंटरनेट डेटा |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
वर्ष | 2023 |
महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2023
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 उद्देश्य
या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोचिंग म्हणजे पुढील शिक्षणा अंतर्गत प्रशिक्षणासाठी इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणे आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास घरीच सुविधापूर्ण वातावरणात पूर्ण करता येईल.
#महाज्योतीतर्फे_नांदेड_येथे_टॅब_वाटप
— MahaJyoti (@MahaJyotiInst) March 1, 2023
महाज्योतीच्या जेईई/नीट/एमएचटी आणि सीईटी या परिक्षांच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील नांदेड विभागातील विद्यार्थ्यांना मोफत टॅब वितरीत करण्यात आले.#महाज्योतीनागपूर#MahajyotiNagpur pic.twitter.com/t0GNmcFKHN
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना मजबूत आणि स्वतंत्र बनवणे.
- महाज्योती मोफत टॅब्लेट योजनेच्या मदतीने राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावणे.
- विद्यार्थ्यांना डिजिटल युगात आणून या डिजिटल माध्यमाचा योग्य पद्धतीने उपयोग करणे शिकविणे.
- महाज्योती मोफत टॅब्लेट योजनेद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे, हि विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा म्हणजे एक प्रकारचे आर्थिक सहाय्यच आहे.
- या योजनेचा मुख्य उद्देश राज्यात डिजिटल शिक्षणाला चालना देणे आणि त्याचबरोबर राज्यात डिजिटल शिक्षणाला मोठ्याप्रमाणात प्रोत्साहन देणे हा आहे
- ही योजना विद्यार्थ्यांना घराच्या सुविधापूर्वक वातावरणात प्रशिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 लाभार्थी पात्रता
महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवीत असते, या योजनांच्या माध्यमातून सरकार राज्यातील जनतेचे कल्याण साधत असते, राज्यातील सरकार महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच राज्यातील गरीब नागरिकांसाठी अनेक योजना राबवीत आहे, त्यांच्यासाठी घरे बांधण्यात येत आहे, त्यांना अनेक अनुदान देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केल्या जात आहे जेणेकरून राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांचे जीवनमान सुधारावे अशा प्रकारे सरकार या नागरिकांना समाजाच्या मुख्यधारेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे, या धोरणाला पुढे नेत शासनाने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थांना आर्थिक सहाय्य म्हणजेच त्यांना 10वी नंतर पुढील शिक्षणासाठी फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 च्या माध्यमातून प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत आहे, विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शासनाने काही पात्रता निकष ठेवले आहे, ते पात्रता निकष खालीलप्रमाणे असतील.
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र योजनेच्या लाभासाठी पात्रता निकष
- योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा किंवा असावी
- त्याचबरोबर अर्ज करणारा उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागासप्रवर्गातील असावा/असावी
- या योजनेच्या अंतर्गत अर्जदार करणारा उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर या उत्पन्न गटातील असावा किंवा असावी
- या योजनेच्या अंतर्गत जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावी वर्गाची परीक्षा देत आहे, ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या सर्व विद्यार्थ्यांनी योजनेंतर्गत अर्ज करतांना दहावी वर्गाचे प्रवेश पत्र आणि नवव्या वर्गाची गुणपत्रिका अर्जाला जोडावी,
- तसेच या योजनेमध्ये लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेणे आवश्यक आहे, आणि या संबंधित कागदपत्रे त्यांनी भविष्यात मार्गदर्शना प्रमाणे उपलोड करणे आवश्याक आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप योजना
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 महत्वपूर्ण वैशिष्ट्ये
महाराष्ट्र मोफत टॅबलेट योजनेची वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र सरकारकडून या योजनेअंतर्गत 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासासाठी आणि उपयुक्त प्रशिक्षणासाठी मोफत टॅबलेट आणि 6 GB इंटरनेट सुविधा प्रतिदिन देण्यात येते. जेणेकरून या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण सुविधाजनक होईल.
- या योजनेच्या माध्यमातून पुरविलेल्या टॅबलेटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोफत टॅबलेट आणि 6GB/Day इंटरनेट डाटाचा लाभ दिला जातो.
- महाज्योती मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र सरकारने इतर मागवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.
- राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली महाज्योती मोफत टॅबलेट योजना ही अतिशय महत्त्वाची आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे.
- फ्री टॅबलेट योजनेंतर्गत राज्यातील 30 लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 या योजनेंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसह महिला विद्यार्थ्यांनाही लाभ मिळणार आहे.
- राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुधारण्यासाठी फ्री टॅबलेट योजना 2023 सुरू करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत मिळालेल्या टॅबलेट आणि इंटरनेट सुविधेच्या मदतीने विद्यार्थ्यांना देशातील विविध घडामोडींची माहिती मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास होईल.
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 योजनेच्या अटी आणि नियम
- महाराष्ट्र मोफत टॅबलेट योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच दिला जाणार आहे.
- फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना दिली जाणार नाही.
- या योजनेंतर्गत अर्जदार विद्यार्थ्यांनी 10वी उत्तीर्ण आणि 11वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र या योजनेत अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31/03/2023 हा आहे
- या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पोस्टाने किंवा ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करणे विचारात घेतले जाणार नाही, म्हणजे त्या अर्जांचा विचार केला जाणार नाही
- जर अर्जदार विद्यार्थ्यांनी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेंतर्गत टॅबलेटचा लाभ घेतला असेल, तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेंतर्गत जाहिरात रद्द करणे किंवा मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे किंवा अर्ज स्विकारणे या संबंधित संपूर्ण अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचेकडे असतील
- या योजनेसाठी अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Center ला संपर्क साधावा, यासाठी संपर्क क्रमांक : 0712 - 2870120/21
- आणि ई-मेल आयडी : [email protected]
- या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून दहावीची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट) आणि MHT-CET/JEE/NEET या या परीक्षेची तयारी करीत आहोत अशा प्रकारचे हमी पत्र मागण्यात येईल.
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 योजनेचे फायदे
महाराष्ट्र शासनाच्या या फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र योजनेचा राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणत लाभ होणार आहे यामध्ये काही लाभ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे या योजनेचे विद्यार्थ्यांना मिळणार आहे, या लाभां संबंधित आपण खाली चर्चा करू
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट मिळेल तसेच इंटरनेट सुविधा सुद्धा मिळेल.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला ऑनलाइन शिक्षणासाठी दररोज 6 GB इंटरनेट सेवा मोफत दिली जाईल.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके दिली जातील.
- या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना JEE, NEET आणि CET ऑनलाइन कोचिंग क्लासेसची मोफत सुविधा दिली जाईल.
- विद्यार्थी या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट वापरून त्यांचा अभ्यास ऑनलाइन पूर्ण करू शकतील.
- टॅबलेटच्या मदतीने, विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसोबत तसेच त्यांच्या शिक्षकांसोबत अभ्यासाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात.
- या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या टॅब्लेटच्या मदतीने विद्यार्थी विविध प्रकारचे ऑनलाइन शिक्षण आणि अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील.
- महाज्योती मोफत टॅब्लेट योजना राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटल जगात एक पाऊल पुढे टाकण्यास मदत करेल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल आणि उंचावेल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी सक्षम आणि स्वतंत्र होतील.
- महाज्योती मोफत टॅबलेट अंतर्गत उपलब्ध टॅबलेट मदतीने, विद्यार्थी शिक्षण आणि अभ्यासासाठी उपयुक्त पुस्तके डाउनलोड करू शकतात.
- या योजनेंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या टॅबलेटच्या मदतीने विद्यार्थी स्वतःची इतर कामे करू शकतील
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
या शासनाच्या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज असेल हि आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील
- विद्यार्थ्याची 9 व्या वर्गाची गुणपत्रिका
- विद्यार्थ्याला 10 वी च्या परीक्षेचे ओळखपत्र द्यावे लागेल
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- अधिकृत जातीचे प्रमाणपत्र
- अधिकृत नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
- फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचनांचे अनुसरण करावे
- या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्याला महाज्योती (https://mahajyoti.org.in/) या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होमपेजवर तुम्हाला नोटीस बोर्ड हा पर्याय दिसेल, या पर्याया अंतर्गत application for MHT-CET/JEE/NEET- 2025 Training या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या नवीन पेजवर तुम्हाला ''Registration Link'' हा पर्याय दिसून येईल
- तुम्हाला आता या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- या पर्यायावर क्लिक करताच आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल
- या उघडलेल्या पेजवर तुम्हाला APPLICATION FORM FOR JEE/NEET/MHT-CET TRAINING 2024-25 हा फॉर्म दिसेल
- आता या फॉर्म मध्ये विचारल्याप्रमाणे तुमचा मोबाइल नंबर भरून व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल
- यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा
- या पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म भरून या फॉर्मला आवश्यक असणारी वर दाखवल्याप्रमाणे संपूर्ण कागदपत्रे स्वक्षांकित करून अचूक आणि स्पष्ट दिसतील अशाप्रकारे स्कॅन करून अपलोड करावे लागेल
संपर्क तपशील
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
---|---|
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र, योजना तपशील PDF | इथे क्लिक करा |
संपर्क तपशील | महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र राज्य, नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा माळा, दिक्षाभूमी रोड, श्रद्धानंदपेठ, नागपूर- 440022 |
फोन नंबर | 0712-2959381 |
ई-मेल | [email protected] |
महाराष्ट्र सरकारी योजना | इथे क्लिक करा |
केंद्र सरकारी योजना | इथे क्लिक करा |
निष्कर्ष
महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांची मदत केली आहे, आणि वर्तमान काळात सुद्धा राज्यातील सरकार विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विविध योजना तयार करत आहे, या योजना समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाच्या ठरतात, हि शासनाची अशीच एक महत्वपूर्ण योजना आहे, या फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना दहावी नंतर त्यांचे उच्च घेण्यासाठी महत्वपूर्ण मदत होणार आहे.
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 FAQ
Q. फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र काय आहे?
केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच देशातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध योजना राबवित आहे. यापैकी एक योजना महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र आहे जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) च्या सहकार्याने इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्याची योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर 6 GB डेटा प्रतिदिन देण्यात येत आहे.
Q. फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र या योजनेंतर्गत काय लाभ दिला जातो?
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट तसेच ऑनलाइन अभ्यासासाठी आणि उपयुक्त प्रशिक्षण पुस्तकांसाठी दररोज 6 जीबी इंटरनेट सुविधा दिली जाते.
Q. फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अंतर्गत पात्रता काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय आणि भटक्या जाती तसेच विमुक्त जमाती अशा विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET - 2025 या साठी पूर्व प्रशिक्षण या योजना या योजनेच्या अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे.
Q. फ्री टॅबलेट योजनेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
हि योजना ज्या विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण करून पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे, आणि ज्यांना पुढे MHT-CET/JEE/NEET या परीक्षांच्या संबंधित तयारी करायची आहे, ते विद्यार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र ठरतात.