75 वर्षा वरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत | मुख्यमंत्र्यांची घोषणा: राज्यातील वरिष्ठ नागरिकांना (75 वर्षावरील) एसटी प्रवास मोफत | महाराष्ट्र मोफत एसटी प्रवास योजना 2023 | ST Mahamandal Yojana | Free Traveling Scheme Maharashtra
महाराष्ट्र शासन वेळोवेळी राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध आणि अनेक प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करत असते, या योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असते, यावेळी माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतंत्र्याच्या अमृत मोहत्सावानिमित्त हि घोषणा केली, महाराष्ट्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नागरिकांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यातील ज्या जेष्ठ नागरिकांनी वयाचे 75 वर्ष पूर्ण केले आहे अशा जेष्ठ नागरिकांना यानंतर एसटी बसच्या प्रवासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही, कारण महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी आता एसटी प्रवास मोफत केला आहे, वाचक मित्रहो, या पोस्ट मध्ये आपण शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णया संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचावा.
{tocify} $title={Table of Contents}
75 वर्ष वरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत हि योजना कशी आहे
![]() |
75 वर्ष वरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत |
शासनच्या या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार पासून सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षे वयाच्या जेष्ठ नागरिकांना एसटी बसमधून विनामुल्य प्रवास शासनाच्या या योजनेचा फायदा जवळपास राज्यातील पंधरा लाख जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे, एसटी महामंडळाच्या शिवनेरी या एसटी सेवें सह सर्व प्रकारच्या एसटी सेवांसाठी हि जेष्ठ नागरिकांची मोफत प्रवास योजना लागू असेल हि माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
देश कि पहली हाइड्रोजन फ्युल बस पुणे में लॉन्च
जेष्ठ नागरिकांसाठी असलेली मोफत एसटी बस प्रवास योजनेची काही वैशिष्ठे
राज्यातील ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेच्या प्रमाणपत्रांचे वितरण आज करण्यात आले. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ राज्यातील सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. pic.twitter.com/seJXrfOQ4g
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 25, 2022
या योजनेच्या संदर्भात अधिक माहिती म्हणजे हि योजनेच शुभारंभ 26 ऑगस्टला झाला आहे, त्यामुळे ज्या नागरिकांनी 26 ऑगस्ट 2022 पूर्वी एसटी मध्य प्रवासासाठी आरक्षण केले असेल आणि 26 ऑगस्ट पासून एसटी प्रवास करण्याऱ्या राज्यातील नागरिकांना तिकिटाचा परतावा शासनाच्या निर्णया प्रमाणे दिला जाणार आहे, या संदर्भातील माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. राज्यातील पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिमंडळच्या अधिवेशना दरम्यान करण्यात आला, या योजनेचे नाव ''अमृत जेष्ठ नागरिक'' असे ठरविण्यात आले आहे, या योजनेचा शुभारंभ झाल्यावर एसटी महामंडळा कडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
399 पोस्ट ऑफिस दुर्घटना बिमा योजना
वरिष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजना Highlights
योजनेचे नाव | अमृत जेष्ठ नागरिक (महाराष्ट्र एसटी बस मोफत प्रवास योजना ) |
---|---|
व्दारा सुरुवात | माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र |
योजनेचा शुभारंभ | 25 ऑगस्ट 2022 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्याचे 75 वर्षावरील वयोगटातील नागरिक |
उद्देश्य | राज्यातील वयोवृध्द नागरिकांना आर्थिक सुविधा |
श्रेणी | योजना |
विभाग | महाराष्ट्र एसटी महामंडळ |
IGR Maharashtra
अमृत जेष्ठ नागरिक योजनेला लागणारी कागदपत्रे
वरिष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजना उद्दिष्टे
जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेचे लाभ
- देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या नंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री यांनी या जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेची घोषणा केली, आणि या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
- जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेचा लाभ कसा मिळवावा :- राज्यातील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रवासाला निघण्या अगोदर त्यांच्या कडे असलेले ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे (पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना या मधील कोणतेही एक, त्यानंतर त्यांना हे ओळखपत्र प्रवासा दरम्यान एसटी वाहकाला दाखवावे लागेल.
- एसटी वाहकाला हि ओळखपत्रे दाखविल्यानंतर वरिष्ठ नागरिकांना त्यांना प्रवासासाठी लागणाऱ्या भाड्यासाठी सवलत मिळेल.
- जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लागणारी पात्रता :- महाराष्ट्र जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजने साठी खालीलप्रमाणे पात्र असणे आवश्यक आहे
- वरिष्ठ नागरिक ज्यांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे ते महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे
- वरिष्ठ नागरिक पंच्याहत्तर वर्षावरील वयोगटातील असणे आवश्यक आहे
- या योजनेचा लाभ फक्त एसटी महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना मिळणार आहे
- या जेष्ठ नागरिक एसटी बस मोफत प्रवास योजनेचा लाभ फक्त राज्याच्या हद्दीमध्यच मिळणार आहे म्हणजे वरिष्ठांना राज्याच्या आतमध्येच प्रवास करण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे.